jalgaon muncipal carporation esakal
जळगाव

Jalgaon | सत्ताधारी, प्रशासनाचे विकासावर नव्हे, पंधराव्या मजल्यावर लक्ष : MLA भोळे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विकासासाठी आम्ही सत्ताबदल केली असे सांगणारे सत्ताधारी आज त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर प्रशासनाचेही कोणत्याही कामाकडे लक्ष नाही. या दोघांचे केवळ पंधराव्या मजल्यावर असलेल्या नगररचना विभागाकडे लक्ष आहे, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश भोळे यांनी केला. आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्‍नावर महापालिका आयुक्तांची नुकतीच भेट घेतली.

त्यांनी शहरातील अनेक समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली, तसेच निधीबाबतही चर्चा केली. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आमदार भोळे म्हणाले, की महापालिकेकडे जनता कर भरते; परंतु त्यांच्या समस्या मात्र सोडविल्या जात नाहीत. जनतेने मोर्चे काढले, आंदोलने केली मात्र कोणालाही काहीही फरक पडल्याचे दिसत नाही.

सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फक्त पंधराव्या मजल्यावर नगरविकास विभागात कोणत्या फायली येतात याकडेच लक्ष असते. त्यापलीकडे त्यांना जनतेचे कोणतेच प्रश्‍न दिसत नाहीत.(MLA Suresh Bhole Statement about Administrations neglect sanitation road problems jalgaon news)

सत्ता घेतली पण.. काम नाही ाशहरात विकास करण्यासाठी पक्ष फोडून त्यांनी सत्ता मिळविली, असा आरोप करून ‘वर्षभरात त्यांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत. त्यांनी शहरात केलेली विकासकामे दाखवावीत,’ असे आव्हानही आमदारांनी दिले.

प्रशासन ढिम्म, वॉटरग्रेस मस्त शहरातील स्वच्छतेच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, की शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. मात्र त्याची स्वच्छता होत नाही. वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यात आला आहे. पण या कंपनीचे लोक कामच करीत नाहीत. त्यांच्याबाबत तक्रारी केल्यास ‘कोणीही आमचे काहीही करू शकत नाही’ अशा ते धमक्या देतात. कंपनीवर कारवाई करण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. प्रशासन त्याबाबत ढिम्मच असल्याचा आरोपही त्यांनी केला. वॉटरग्रेस कंपनीबाबत आपण विधिमंडळात तारांकित प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार म्हणून निधी आणला आमदार म्हणून विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी आपण केली आहे, असे सांगून आमदार भोळे म्हणाले, की हुडको, जेडीसी बँक कर्जफेडीसाठी आपण प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला, त्यातही २५ कोटींचा निधी उपलब्ध झालेला असताना तो निधीही या प्रशासनाने खर्च केलेला नाही. आपण त्यांना ५८ कोटींच्या निधीचा प्रस्तावही मागविला आहे. शिवाजीनगर पूल, पिंप्राळा पूल यासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे तो आपण राज्य सरकारच्या निधीतून करण्यासाठी प्रयत्न केले. अद्यापही आपले निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु हे महापालिका प्रशासन कार्य करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी आपल्यावर टीका करीत असतात; परंतु ते मात्र कोणतेही काम करीत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT