Mock Drill Movement in kolhe school jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Mock Drill : शाळेवर दहशतवादी हल्ला अन्‌ प्रतिहल्ल्या; भिती, उत्कंठा अन्‌ खाकीवरचा विश्‍वास सार्थकी..!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जुने जळगाव परिसरात मंगळवारी (ता. ८) दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी अचानक पोलिस वाहनांचा ताफा, एकामागुन एक गाड्या, अॅम्बुलन्स, कमांडो पथके दाखल होत असल्याचे पाहुन परिसरातील नागरिकांनी नजरा वळवल्या.

का. ऊ. कोल्हे विद्यालयात एके-४७ घेवुन काळ्या कपड्यातील कमांडो सावधगीरीने शिरताना दिसत असल्याने साऱ्यांचाच श्‍वास जागीच थांबला. थोड्यावेळाने ‘मॉक ड्रील मुहमेंट’ असल्याचे कळताच सर्वांच्या चेहऱ्यांवर दिलासा आणि पोलिस दलावरील विश्‍वास तरळू लागला. (Mock Drill Movement in kolhe school jalgaon news)

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या चारही बाजुला नागरी वस्ती, समोर पेट्रोल पंप, भाजी बाजार आणि वर्दळीचे रस्ते असा परिसर असल्याने मुद्दाम याच भागात मॉक ड्रील घेण्याचे ठरवण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास तोंड बांधलेले तिन दहशतवादी शाळेत घुसवण्यात आले अन्‌ अवघ्या दहाव्या मिनिटांतच पोलिसांनी संपुर्ण परिसराचा ताबा मिळविला.

हातात ऐके- ४७ रायफल्स घेत काळ्या कपड्यातील कंमाडो पथकांनी गटागटाने शाळेत सावधगीरीने चाल केली. दहशतवाद्यांनी मुख्याध्‍यापीका श्रीमती गोसावी यांना ओलीस धरले असताना डीवायएसपी संदिप गावीत क्युआरटी कमांडो पथकासह दाखल झाले. सोबत पोलिस निरीक्षक आर. टी. धारबडे हे शनिपेठ पोलिसांसह पोचले. दहशतवाद्यांना शरण येण्याबाबत आवाहन करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एक ठार... दोन अटकेत

दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेने गोळीबार झाल्यानंतर क्युआरटी फोर्सच्या जवानांनी ॲक्शन घेत प्रत्युत्तर म्हणून ताबडतोब गोळीबार केला. यात, एक दहशतवादी जागीच मरण पावल्यानंतर उर्वरीत दोघांमध्ये चलबिल होत असतानाच जवनांनी त्यांना शस्त्रांसह झडप घालत जिवंत पकडून मुख्याध्यापिकांची सुटका केली. जखमींना तातडीने ॲम्बुलन्सद्वारे जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

"या मॉकड्रील संदर्भात मुख्याध्यापक आणि मोजक्या शिक्षकांना सांगण्यात आले होते. परिसरातील नागरिकांना मात्र ऐनवेळी कळले. या मॉकड्रीलमधुन विद्यार्थी, नागरिक आणि आमच्या कमांडोंनाही बऱ्यापैकी परिस्थीतीची जाणीव झाली. खऱ्या प्रसंगाला प्रखरतेने कमांडो सामोरे जातील." -संदिप गावीत, उपविभागीय पोलिस अधीकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT