जळगाव

Jalgaon Crime News : तरुणीला छेडणाऱ्या एकाला मिळाला पोलिसांकडून प्रसाद; डायल 112 चा विधायक उपयोग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा उपयोग केल्याने तरुणींना छेडणाऱ्या एकाला ‛प्रसाद ’ देण्यात आला तर एकाचे अडीच लाखाचे हरवलेले ब्रेसलेट परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

तालुक्यातील एका खेड्यावरून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करून दुसऱ्या खेड्यावरील एमएसडब्ल्यू झालेल्या तरुणाने छेडण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याने त्या तरुणींना डायल ११२ ची आठवण झाली. (molester beaten up by police jalgaon crime news)

त्यांनी ११२ डायल करताच पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या आदेशाने निलेश मोरे व गणेश पाटील यांनी बसस्थानकावर धाव घेत त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण मनोरुग्ण असल्याने पोलिसांच्या अंगावर धावून गेला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेऊन ’प्रसाद’ दिला. नंतर त्याच्या पालकांना बोलावून समज देण्यात येऊन त्याला सोडून देण्यात आले.

दुसऱ्या घटनेत सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या हातातील सुमारे अडीच लाखाचे २५ ग्राम सोन्याचे ब्रासलेट रस्त्यात पडले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी ११२ च्या पथकाला तत्काळ पाठवले.

शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका महाविद्यालयीन तरुणाने ते बेंटेक्स समजून घरी नेले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या घरून ब्रासलेट ताब्यात घेऊन सुरेश पाटील यांना परत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, निलेश मोरे, महेश पाटील, प्रवीण पाटील हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT