Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : सहनशीलतेची टर्रर्र उडवली जातेय... तरीही आपण शांतच!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ठराविक मर्यादेपर्यंत सहनशील असणे समजण्यासारखे. मात्र, हीच सहनशीलता टर्रर्र उडविण्याचा आणि गमतीचा विषय होत असेल, तर त्या सहनशीलतेचे कुंपण तोडून बाहेर यावंच लागेल; पण जळगाव शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नागरिकांना हे कुणी सांगावे?

जळगाव शहरावर अनन्वित अत्याचार होत असताना आणि जिल्हाही विकासापासून वंचित असताना, जळगावकरांची सहनशीलता चीड आणणारी, गुलामगिरीचा प्रत्यय देणारी आहे. त्यामुळे प्रशासन नावाची यंत्रणा मुजोरी होऊन बसलीय अन्‌ दुसरीकडे लोकप्रतिनिधी एकमेकांची उणीदुणी काढून राजकारणापलीकडे काही करीत नसल्याचे चित्र आहे. (Monday Column Article About Municipal corporation road construction road development and garbage problem Jalgaon news)

आपणच आपल्या लोकांविषयी बरेवाईट काय लिहायचे?, पण जळगाव शहर असो की जिल्हा. इथल्या समाजाची मानसिकता बदलायला तयार नाही. जळगाव शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

शहरात ना रस्ते, ना गटारी, ना स्वच्छता, ना पथदीप. पाणी मिळतंय; पण ते दोन दिवसांआड. त्यातही वारंवार गळती होणाऱ्या जलवाहिन्या, व्हॉल्व्ह दुरुस्त्या या वेळापत्रकात अनेकदा अडथळा आणतात. २०१७ मध्ये अडीच वर्षांच्या मुदतीने ‘अमृत’ योजनेचे काम सुरू झाले खरे, पण सहा वर्षांनंतरही ‘अमृत’ जळगावकरांच्या नशिबी आलेच नाही.

‘अमृत’ने रस्त्यांमधील खड्ड्यांनी सांधे, मणक्यांचे आजार आणि श्‍वसनाच्या विकारांचे गिफ्ट मात्र दिले. जळगावकर एवढे सहनशील, की सुविधा नसताना दुप्पट, तिपटीने वाढविलेल्या मालमत्ताकराला आम्ही विरोध तर केलाच नाही, उलटपक्षी त्याचा सहर्ष स्वीकारच केल्याचे दिसते.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

म्हणायला वाढीव घरपट्टीवर हरकती हजारोंच्या संख्येने आल्या. मात्र, मुजोर प्रशासनाने त्या सरसकट एकच नियम लावत धुडकावून लावल्या.

महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे, ते वाढविण्याला खरेतर कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही; पण कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसताना आहे तो मालमत्ताकर मागण्याचा अधिकारच मनपाकडे नाही. त्यातही वाढीव मालमत्ताकर लादून महापालिका प्रशासनाने आणि प्रशासनाच्या आडून महापालिकेचा गाडा हाकणाऱ्यांनीही जळगावकरांच्या सहनशीलतेची टर्रर्रच उडविली आहे.

कोट्यवधींचे आकडे सादर करत शहरातील रस्ते कामांचे दाखले दिले जात आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामेही सुरू आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही कामे होत असताना, ती अत्यंत तंत्रशुद्ध व गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, गुणवत्तेच्या प्रगतिपुस्तकावर ही कामे उत्तीर्ण होणेच शक्य नाही.

आपल्याच कराच्या पैशांतून होणारी ही गुणवत्ताशून्य, दर्जाहीन कामे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. एखाद्याने त्याविरोधात भूमिका घेतली, तरी त्याच्या मागे उभे राहायला कुणी तयार नाही. जळगाव महापालिकेतून निवृत्त झालेल्या तत्कालीन आयुक्ताने ‘जळगावकर खूप सहनशील असल्याची’ केलेली टिपणी त्यामुळेच स्वाभाविक ठरते.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

जळगाव जिल्ह्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. देशात, राज्यात चौफेर रस्त्यांची कामे होतांय. गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गाचेही लोर्कापण झाले. मुंबई, नाशिकच्या विकासात भर घालणारा, मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला दिशा देणारे राजमार्ग सर्वत्र होताय. एका ना अनेक औद्योगिक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जातेय, पण या बातम्यांमध्ये जळगाव जिल्हा कुठेही नाही.

तरीही जळगाव जिल्ह्यातील नागरिक काही बोलायला तयार नाहीत. कारण, एकच... आपण खूप सहनशील आहोत. पश्‍चिम महाराष्ट्रातून आलेल्या महसूलमधील एका अधिकाऱ्याची याबाबत प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘काय राव, तुमचा जिल्हा.

कितीही फिरवले कामासाठी तरी इथं कुणी बोलत नाही अन्‌ वरून पैसेही देऊन जातांय. आमच्याकडं काम नाही केलं एखाद्याचं, तर जोडाच काढतंय ते.’ ही आपली, आपल्या सहनशीलतेची औकात. आपल्या हक्काच्या सुविधा, हक्काचा विकास साधायचा असेल तर या सहनशीलतेचं कुंपण तोडावंच लागेल. ते कधी तोडतायाचे याची जळगावकर प्रतीक्षा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT