पाचोरा (जि. जळगाव) : येथील पालिकेच्या निवडणुकीची (JMC Election) प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू झाली असून, मतदारयाद्या (Voter List) प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुक व नेतेमंडळींच्या हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात दिवसागणिक तापत आहे. (movement of aspirants as electoral lists are published Jalgaon Municipal Corporation Election Jalgaon News)
पाचोरा पालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ प्रभागांतून २६ जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व जनाधार विकास आघाडीत चुरशीच्या लढतीत जुंपल्या होत्या. साम, दाम, दंड भेद या सर्व मार्गांचा वापर या निवडणुकांमध्ये पुरेपूर करण्यात आला. त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ११ जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. राष्ट्रवादीला ७ जागांवर, भाजपला २ जागांवर तर जनाधार आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. आघाडी धर्म विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला विकासकामांसाठी सहकार्याची भूमिका घेतल्याने शहराच्या विविध भागात अनेक विकासकामे झाली.
दरम्यानच्या काळात रस्त्यांच्या व विकासाच्या कामांसाठी राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याने ठेकेदारांना रस्त्यांची मोठ्या प्रमाणात डागडुजी करावी लागली होती व प्रभाग नऊमधील रखडलेल्या विकास कामांना चालना मिळाली होती. अमोल शिंदे यांनी नंतरच्या काळात भाजपत प्रवेश केला व त्यांनी तीन अपत्याच्या कारणावरून राजीनामा दिल्याने प्रभाग सहामध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण वाघ विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या वाढली होती.
शासनाच्या निर्णयानुसार नव्याने प्रभागरचना झाल्याने आधीच्या १३ प्रभागांतील २६ सदस्यांऐवजी आता १ प्रभाग व २ सदस्य वाढून १४ प्रभागांतून जागांसाठी २८ सदस्य निवडले जाणार आहेत. बहुसंख्येने प्रभागांची तोडफोड झाल्याने इच्छुकांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या कामांवर पाणी फिरले आहे. तर काहींसाठी प्रभाग अत्यंत फायदेशीर झाले आहेत. काहींना प्रभाग बदलावे लागत असल्याने तसेच प्रभागास नवीन भाग जोडण्यात आल्याने बहुतांश इच्छुकांनी प्रभागाचा अभ्यास करून त्या त्या प्रभागात आपले अस्तित्व आणि महत्त्व सिद्ध करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्याने इच्छुक उमेदवारांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, मनसे व बहुजन वंचित आघाडी या पक्षांच्या नेते मंडळींकडून मतदार याद्यांचा अभ्यास केला जात आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणीही पक्षाच्या नेते मंडळींकडून केली जात आहे.
प्रभावी उमेदवाराचा शोध सुरू
सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे प्रभाग व उमेदवारांमध्ये देखील बदल होण्याचा अंदाज बांधला जात असल्याने अपक्ष इच्छुकांकडून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आरक्षणामुळे देखील काहींचे प्रभाग व उमेदवार बदलणार असल्याने त्यानुसार प्रभावी उमेदवार कोण राहील? त्यादृष्टीने राजकीय पक्षांची नेतेमंडळी प्रभावी उमेदवार आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सर्वार्थाने करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.