Muckermacosis Muckermacosis
जळगाव

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

म्युकरमासकोसिस वॉर्डास भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकरमासकोसिसच्या (Muckermacosis) रुग्णांवर उपचारासाठी साहित्य व औषधी जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी (Funding) जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिले.

(mucomycosis patients separate room for treatment)

पालकमंत्र्यांनी शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकरमासकोसिस वॉर्डास भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासन डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह महाविद्यालय व सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

५० बेड सज्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डात ५० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत १५ रुग्ण उपचार घेत असून पैकी २ रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराचाही आढावा घेतला.

(mucomycosis patients separate room for treatment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT