jalgaon municipal corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त जाहीर करणार

२०२४-२५ चे अंदाजपत्रक इतिहासात प्रथमच महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड सादर करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने २०२४-२५ चे अंदाजपत्रक इतिहासात प्रथमच महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड सादर करणार आहेत. महापालिकेची २१ मार्च२००३ मध्ये स्थापन झाल्यापासून नियमितपणे पंचवार्षिक निवडणूका होत आहेत.

परंतु २०२३ ला महापालिकेच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपल्यानंतर राज्यात मुंबईसह कुठल्याच महापालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. राज्यभर सगळ्याच महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने यंदाचे प्रशासकीय अंदाजपत्रक असणार आहे. (Municipal Administrator Dr Vidya Gaikwad will present budget for 2024 25 for first time in history jalgaon news)

ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायलयात प्रलंबीत असल्यामुळे जळगावसह राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका, पालिका , जिल्हा परिषदांच्या निवडणूका घेतल्या गेलेल्या नाहीत. त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.

जळगाव महापालिकेतही महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचा २०२४-२५चे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यात सादर करणे आवश्‍यक असते. लोकनियुक्त सदस्य असल्यास स्थायी समिती सभेत अंदाजपत्रक आयुक्त स्थायी समिती सभापतींकडे सादर करतात.

त्यानंतर स्थायी समिती सभापती ते महासभेत महापौरांकडे पाठवितात. त्या ठिकाणी महापौर ते विशेष अंदापत्रकीय सभेत ते सादर करतात.

मात्र महापालिकेत आता लोकनियुक्त सदस्य नाहीत त्यामुळे स्थायी समिती सभापती व महासभेचे अधिकारी आयुक्त तथा प्रशासकांना असतात. महापालिकेचे मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे अंदाजपत्रक तयार करून आयुक्तांना देतील, त्यानंतर आयुक्त ते जनतेसाठी सादर करतील.

महापालिकेचा २०२४-२०२५ चे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यात सादर होणार आहे. त्याबाबत अद्याप प्रशासनाने तारीख जाहीर झालेली नसली तरी त्यांची तयारी मात्र सुरू केली आहे.

मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे,मुख्यलेखापरीक्षक मारोती मुळे तसेच अतिरिक्त आयुक्त,सहाय्यक आयुक्त व उपायुक्त अंदाजपत्रकांची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले. यावर्षीच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाकडे जनतेचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT