Jalgaon Municipality News : महापालिकेने शास्त्री टॉवर ते नेहरू चौक मार्गावर पार्किंगसाठी पांढरे पट्टे आखून पट्ट्याच्या आत वाहन पार्किंगच्या सूचना दिल्या आहे.
मात्र त्यानंतरही पट्ट्याच्या बाहेर पार्किंग करणाऱ्या बेशिस्त दुचाकी वाहनांवर आज कारवाई करीत वाहने जप्त करून कारवाईसाठी शहर वाहतूक विभागाकडे सुपूर्द केली. (Municipal Corporation started action against two wheelers and four wheelers on road jalgaon news)
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शास्त्री टॉवर ते नेहरू चौक दरम्यान महापालिकेने रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या दुचाकी वाहने तसेच चार चाकी विक्रेत्यावर कारवाई सुरू केली आहे.
प्रारंभी दुचाकी वाहनासाठी पार्किंगची सुविधा करण्यासाठी दुकानदारांना नोटीस बजावून तळघरात पार्किंग करण्याबाबत सुचविण्यात आले. ज्यांनी सुविधा केली नाही, त्या दुकानांना सील लावण्यात आले.
ज्या दुकानांनी तळघरात पार्किंग सुविधा केली त्यांचे सील काढण्यात आले, त्यामुळे आता दुकानांसमोर पार्किंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर महापालिकेने दुभाजकापासून बारा मीटरचे अंतर ठेवून त्या ठिकाणी वीटा लावून कायमस्वरूपी पांढरे पट्टे आखण्यात आले आहेत.
धडक कारवाई
पांढरे पट्टे आखल्यानंतर महापालिकेने आता धडक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर पार्किंग करण्यात आलेली दुचाकी वाहने आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केली आहेत.
दुपारी ही कारवाई करण्यात आली.अचानक ही कारवाई सुरू झाल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली .
वाहतूक पोलिसांनी आकारला दंड
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुचाकी वाहने जप्त करून ती वाहतूक पोलिसांकडे देण्यात आली आहेत. वाहतूक पोलिस संबंधित वाहनचालकांना दंड आकारणी करणार आहेत.
नागरिकांनी पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर गाड्या लावू नये असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.