Jalgaon News : केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शहरांच्या विकासासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेत जळगाव शहरातील अविकसित ६६ हेक्टर क्षेत्राच्या विकासाकरीता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Municipal Corporation will get interest free loan from Central government jalgaon news)
केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यात शहरीकरणाच्या विकासाला चालना देण्यासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गंत ५० वर्षांकरीता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या अनुषंगाने पुणे येथील नगररचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली.
त्यावेळी श्री. पाटील यांनी सर्व मनपा आयुक्तांना आपल्या शहरातील प्रकल्पांची माहिती पाठविण्याचे निर्देश दिले होते. राज्यातून आलेल्या महापालिकांच्या विकासाचा आराखडा पाटील यांनी केंद्र शासनाकडे सादर केला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यात जळगाव महापालिकेने शहरातील अविकसीत ६६ हेक्टर क्षेत्राचा विकास करण्यासाठी महापालिकेला कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. या आराखड्यात जळगावसह आसोदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा, आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार आहे.
जुना राष्ट्रीय महामार्ग व नवीन राष्ट्रीय यांच्यामधील ६६ हेक्टर क्षेत्राचा त्यात सामावेश आहे. या ठिकाणी पुढील वीस वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येला गृहीत धरून रस्ते, शाळा, कॉलेज, दवाखाने, ओपन स्पेस, हरित क्षेत्र, क्रीडांगणे आदींसह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विकास कामासाठी महापालिकेला जेवढा खर्च लागणार आहे. तेवढे कर्ज केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.