Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित नव्वव्या दिवशी बाहेर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात निवृत्तीनगरात मध्यरात्री वाळू व्यावसायिक भावेश उत्तम पाटील (वय २६) हत्येप्रकरणात अटकेतील संशयित कारागृहात असताना, वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नाही, म्हणून दोघी संशयितांना जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. जिल्‍हापेठ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संशयितांची जामिनावर मुक्तता झाल्याचे बोलले जात आहे.

निवृत्तीनगरात शंभर फूटी रस्त्यावर २४ ऑगस्टला मध्यरात्री भावेश उत्तम पाटील याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन २४ तासांत खुनाचा उलगडा केला.

२५ ऑगस्टला पुण्यातून संशयित मनीष नरेंद्र पाटील (रा. आव्हाणे), भूषण रघुनाथ सपकाळे (रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) या ताब्यात घेतले. पोलिस कोठडी पूर्ण झाल्यानंतर दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. तेव्हापासूनच दोघेही जिल्‍हा कारागृहात होते. संशयितांचा जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल झाल्याशिवाय जामीन अवघड असल्याने बचावपक्ष ‘वेट ॲन्ड वॅाच’च्या भूमिकेत होते.(Murder suspect out on ninth day Jalgaon Crime News)

दोषारोपपत्राअभावी नामुष्की

वादग्रस्त कारकिर्दीचे धनी, निरीक्षक अरुण धनवडे यांची नुकतीच चार दिवसांपूर्वी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यातून उचलबांगडी करण्यात येऊन नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. याच अरुण धनवडे यांच्याकडे भावेश पाटील खून प्रकरणाचा तपास होता. गुन्हे शाखेने आयते संशयित आणून दिले. खुनातील शस्त्र जप्त करून दिले. साक्षीदार, पुरावे सगळेच आपसूक मिळून आले असताना आणि विशेष म्हणजे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पाठपुरावा करवून दोषारोपपत्र पूर्ण करवून घेतले होते. तरीही या गुन्ह्यात विशेषतः वाळूमाफियांच्या आपसी वादाच्या खुनाचे दोषारोपपत्र वेळेत न्यायालयात सादर झाली नाहीत.

बचाव पक्षाने मारलीच बाजी

संशयित मनीष पाटील व भूषण सपकाळे यांचे वकील ॲड. मुकेश शिंपी दोघांच्या जामीनासाठी दोषारोपपत्र दाखल करण्याची वाट पाहत होते. मात्र, ९० दिवस उलटूनही पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले नव्हते. त्याच दिवशी संशयितांतर्फे मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती देशपांडे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस दोषारोपपत्र घेऊन न्यायालयात धावत सुटले. मात्र, ९० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने कलम-१६७ (२) अन्वये न्यायालयाने दोघांना जामिनावर मुक्त केल्याचे ॲड. शिंपी यांनी सांगितले.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

कायदा व सुव्यस्था धोक्यात

भावेश पाटील खून प्रकरणातून वाळूमाफियांचे वर्चस्व सिद्ध होत असल्याची चर्चा आहे. महसूल व पोलिस प्रशासन दावणीला बांधल्याप्रमाणे चित्र यामुळे निर्माण झाले असून, भावेश पाटील याच्या खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळविणाऱ्या दोघा संशयितांप्रती गावात प्रचंड संतप्त भावना आहे. त्याचप्रमाणे दोघा संशयितांनी अटकेपूर्वीच ‘एकाचा गेम केलाय, आता दुसऱ्याचा नंबर’, असे धमकावल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांची अशा पद्धतीची कार्यपद्धती असेल, तर कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखली जाईल, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT