Sahebrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News: अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावेही दुष्काळसदृश्य यादीत; आमदार पाटील यांनी मागितला शासनाकडे न्याय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावे देखील दुष्काळ सदृश्य यादीत आल्याची शासनाची चूक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उघडकीस आणली आहे. यादी दुरुस्त करून या मंडळांना अतिवृष्टीचे लाभ मिळावेत, अशी मागणीही माजी आमदार पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.(names of mandals which have experienced heavy rainfall are in drought prone list jalgaon news)

शासनाने पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजल कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पिकांची स्थिती पाहून राज्यातील १ हजार २१ मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या यादीत पारोळा तालुक्यातील शेळावे, बहादरपूर, चोरवड या तीन मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाची यादी कशी चुकीची आहे, हे सिद्ध करण्यासाठी शासनाच्या व महावेधच्या पर्जन्यमानाचे आकडे सादर केले आहेत. पारोळा तालुक्यात शेळावे मंडळात जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी ६१९.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना त्या मंडळात ६५९.४० मिमी म्हणजे १०६ .४२ टक्के पाऊस पडला आहे.

या मंडळात ६ जुलै, ८ व २१ सप्टेंबर रोजी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच बहादरपूर मंडळात ६५९.३० मिमी म्हणजे १०५.११ टक्के पाऊस तर चोरवड मंडळात ६३२.९० मिमी म्हणजे १०२ टक्के पाऊस पडला आहे. या दोन्ही मंडळात देखील ७, ८ व २१ सप्टेंबरला ६५ मिमीपेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाली आहे.

त्यामुळे शासनाच्या चुकीच्या आदेशात दुरुस्ती करून या तिन्ही मंडळांना दुष्काळसदृश्य परिस्थितीतून वगळून त्यांना शासन निर्णयानुसार अतिवृष्टीची मदत मिळावी. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबरच्या आकस्मिक पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतीपिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर सरसकट तत्काळ मदत करावी, अशीही मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT