MGNREGA News esakal
जळगाव

MGNREGA News : घामाला दाम कमी, मजुरीत 24 रुपयांची वाढ! 14 हजार मजुरांना मिळाले काम; 503 गावांत ‘रोहयो’ची कामे सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उन्हाळ्यात गावागावांतील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून रोजगार हमी योजनेतून जिल्हा प्रशासनातर्फे कामे दिली जातात. सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला. सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली. मात्र, रोजगार हमी योजनेची काम करणाऱ्यांची मजुरी केवळ २४ रुपयांनी वाढली. यामुळे ४२ अंश तापमानात काम करूनही रोज २९७ रुपयेच मजुरी मिळत आहे. (jalgaon price of sweat reduced wage increased by 24 rupees MGNREGA news)

मागील वर्षीही मजुरी २७३ रुपये होती, पण याच योजनेच्या विविध कामांवरील मजुरांची मागील १२ वर्षांपासून चेष्टाच केली जात आहे. मागील १३ वर्षांत महागाईने नवनवीन उच्चांक गाठला, पण याच काळात संबंधित मजुरांच्या मजुरीत केवळ १७० रुपयांची वाढ झाल्याचे वास्तव आहे.

सध्याच्या महागाईच्या काळात २९७ रुपये मजुरी ‘रोहयो’च्या मजुरांची थट्टाच करणारी ठरत असल्याचा आरोप ‘रोहयो’च्या मजुरांकडून होत आहे. उन्हात सिमेंट रस्ता, साठवण तलाव, सिंचन विहिरी, पाणंद रस्ता, दुतर्फा रस्ते रोपवाटिका, स्मशानभूमी शेड, घरकुल, रोपवाटिका, शेततळे, गोठा शेड आदी कामांचा समावेश आहे. ५०३ गावांत २०१० कामे सुरू आहेत.

ना प्यायला पाणी, ना विश्रांतीला सावली

अनेक ठिकाणी आडरानात कामे सुरू असल्यामुळे तिथे मजुरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, दुपारी तीव्र उन्हात मजुरांना कामबंद ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. विश्रांतीसाठी मजूर एखाद्या झाडाचा आधार घेताना दिसतात. रोजगारासाठी स्थलांतरित न होता गावातच हाताला काम मिळत असल्यामुळे तरुण, वयोवृद्ध, महिलांचा ओढा रोजगार हमीच्या कामांकडे वळला आहे. आज घडीला जिल्हाभरात रोजगार हमीच्या कामांवर १४ हजार ३५३ मजूर काम करीत आहेत. (Latest Marathi News)

सध्या कमाल तापमान ४२ अंशांवर

जिल्ह्यात सध्या ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर पुरुष-महिला मजुरी पदरात पाडून घेण्यासाठी कशाचीच पर्वा न करता भर उन्हातही काम करीत आहेत.

अशी वाढली मजुरी

वर्ष--मजुरी

२०११--१२७

२०१२--१४५

२०१३--१६२

२०१४--१६८

२०१५--१८१

२०१६--१९२

२०१७--२०१

२०१८--२०३

२०१९--२०६

२०२०--२३८

२०२३--२७३

२०२४--२९७

तालुकानिहाय मजूर असे

तालुका- मजूरसंख्या

अमळनेर--१०२८

भडगाव--५४९

भुसावळ--२००

बोदवड--२११

चाळीसगाव--२४७६

चोपडा--७१६

धरणगाव--४९९

एरंडोल--२५०

जळगाव--२१९

जामनेर--२२५७

मुक्ताईनगर--८१०

पाचोरा--८७७

पारोळा--३७०४

रावेर--२७८

यावल--२७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT