Jalgaon News : येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेतर्फे येत्या २५ फेब्रुवारीला पर्यावरण साहित्य संमेलन होणार होणार आहे. पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिक श्रीमती केटी बागली यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेतर्फे हे तिसरे पर्यावरण साहित्य संमेलन होत आहे. (Nature Conservation School is going to organize an Environment Literature Conference on 25th February jalgaon news)
यापूर्वी प्रसिद्ध मराठी लेखिका विना गव्हाणकर आणि वन्यजीव क्षेत्रातील तज्ञ किशोरी ते यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले आहे. केटी बागली यांनी निसर्ग संवर्धनावर विपुल लेखन केले असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले काम आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.
श्रीमती केटी बागली या सुक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासक असून त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये त्यांनी कीटक शास्त्र, पक्षीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आणि जैवविविधता या क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची निर्मिती आणि प्रशिक्षणाचे संयोजन केले आहे.
निसर्ग संवर्धनावर आधारित ३५ पेक्षा अधिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आह, त्यात, प्रामुख्याने राणी बाग १५० इन्सेक्ट वर्ल्ड, गॉडस् ग्रीन ग्रिपिंग टेल, स्टोरीज ट्रिज फॉर्म इंडिया फ्लाईट, ऑफ द पिंक हेडेड डक, कपेला बॉय, अन्न हे पूर्णब्रह्म (मेघा राजाध्यक्ष आणि के टी बागली इंग्रजी पुस्तकावर आधारित).
ऑन द वर्ल्ड साईड, गर्ल्स अँड हीजस्, हाऊ ब्लू इज वर प्लॅनेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्या यंग वर्ल्ड आणि द हिंदू या शालेय मुलांसाठी समर्पित असलेल्या आणि इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकासाठी सातत्याने स्तंभ लेखन करतात.
यांची पुस्तके आणि साहित्य संपदा शालेय पुस्तकांसाठी आणि प्राणी शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ साहित्य म्हणून शिफारस करण्यात आलेली आहे.
पर्यावरण साहित्य संमेलनामध्ये श्रीमती केटी बागली यांची प्रकट मुलाखत योजण्यात आली असून, त्या थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यावरण साहित्य संमेलनामध्ये पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर आधारित कथाकथन आणि कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे.
याविषयी निवड फेरी येत्या १३ फेब्रुवारीस पर्यावरण शाळा, कोल्हे नगर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी चेतना नन्नवरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.