Municipal President Ashok Ladvanjari along with office bearers and activists while giving a statement to the District Collector on behalf of Nationalist Congress Party.  
जळगाव

Jalgaon News: पिंप्राळा पुलाची कोनशिला तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; खडसेंचे नाव असल्याने सत्ताधाऱ्यांचा राग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पिंप्राळा उड्डाणपुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतर अवघ्या काही तासात ती फोडण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांव गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

कोनशिलेवर माजी मंत्री विधान परिषद सदस्य एकनाथ खडसेंचे नाव असल्यामुळे तसेच मंत्र्यांचे नाव नसल्याने सत्ताधारी समर्थकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी या कोनशिलेची तोडफोड केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (NCP demands to file charges against those who broke cornerstone of Pimprala bridge jalgaon news)

शहरातील शिवाजीनगर ते भोईटे नगर पिंप्राळ्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. मात्र अवघे काही तास होत नाही तोच या पुलाची कोनशिला फोडण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पक्षीय अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या कोनशिलेवर मंत्र्यांचे नाव नसल्याने ती फोडण्यात आली असावी अशी शंकाही आता व्यक्त होत आहे. मात्र ही कोनशिला कोणी फोडली याबाबत काहीही समजलेले नाही. मात्र यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने या वादात उडी घेतली आहे. कोनशिला तोडल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकांऱ्याना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत म्हटले आहे की, आयोजकांनी जळगाव जिल्ह्यातील तीन्ही मंत्र्याची नावे कार्यक्रम पत्रिकेत कोनशिलेत नमूद करण्यात आला नव्हता, मात्र पत्रिकेत कोनशिलेवर माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांचे नाव होते.

त्यामुळे सत्ताधारी मंत्र्याच्या समर्थकांचा राग अनावर झाल्याने रात्री पुलावर लावण्यात आलेल्या कोनशिलेची मोडतोड केली आणि मर्दुमकी दाखविण्याचा प्रकार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

पुलास आबेंडकरांचे नाव द्या

पिंप्राळा उड्डाणपुलास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ही या निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने ताबडतोब निर्णय न घेतल्यास पक्षातर्फेत्यावर नावाचा फलक लावण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हामहानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, उपाध्यक्ष किरण राजपूत, अशोक सोनवणे, सुनील माळी, सारंगधर अडकमोल, इब्राहीम तडवी आदींनी हे निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT