Sharad pawar vs Ajit pawar Esakal
जळगाव

NCP Political Crisis : एरंडोलला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम; राज्यातील घडामोडींकडे लक्ष

आल्हाद जोशी

NCP Political Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी भाजप - शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होऊन राजकीय भूकंप केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पक्षाचे पदाधिकारी कोणती भूमिका घ्यावी, अशा संभ्रमावस्थेत सापडले आहेत. (ncp political Party office bearers in city and rural areas were in a state of confusion jalgaon news)

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर एका जबाबदार पदाधिकाऱ्याने ‘आता भाजपशिवाय पर्याय नाही’, असे सांगून तालुक्यात देखील राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची स्थिती असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेली फूट स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, आमदार, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप निर्माण करून सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात कोणती भूमिका घ्यावी, असा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी योग्यवेळी निर्णय घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी टोकाची भूमिका घ्यायला नको होती, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले तर पक्षनेतृत्वाने अजित पवार यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राजकीय क्षेत्रातील नेत्यांना पुतण्यांपासून धोका निर्माण होत असल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री (कै.) गोपीनाथ मुंढे, बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक उदाहरणे असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्याविरोधात देखील त्यांचे पुतणे तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे.

तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनाही मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्यासमोर कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न उभा राहिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरात मजबूत संघटन आहे, तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महात्मा फुले समता परिषदेचे संघटन देखील चांगले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समता परिषदमध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक होती, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाला होता.

ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन कमकुवत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता दिसून आली

तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे मतदारसंघात निश्‍चित पडसाद उमटतील, असा दावा भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT