जळगाव : एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद झाल्यानंतर, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दरवाजे खुले करण्यासाठी आपण प्रयत्न केले. मग ‘राष्ट्रवादी’त आपले दरवाजे कसे बंद होतील, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (NCP Sanjay Pawar reply to eknath Jalgaon Political News)
हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत संजय पवार यांनी शिंदे-भाजप गटाकडून उमेदवारी केली, तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या गटातच राहावे, यासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांचाही फोन आला होता. मात्र, त्यांनी शिंदे-भाजप गटातच उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दरवाजे आता बंद झाले आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे श्री. खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यावर उत्तर देताना संजय पवार म्हणाले, की एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद झाले होते.
त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात घ्यावे, यासाठी आपण स्वत:च प्रयत्न केले होते. त्यामुळे आपले राष्ट्रवादीचे दरवाजे बंद होण्याची शक्यताच नाही. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडलेली नाही. सहकारात कोणताही पक्ष नसतो. त्यामुळे आपण शिंदे-भाजप पॅनलकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या पॅनलमध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे हे पक्षीय पॅनल नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांनी आपल्याला राष्ट्रवादी शिकवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.