Jalgaon News : शहरातील आकाशवाणी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास वाळू वाहतुकदार संघटनेचा अध्यक्ष विठ्ठल पाटील याने जिपच्या बोनटवर बसुन केलेला स्टंट म्हणजे पोलिस दलाच्या कर्तबगारीचा नमुनाच मानला जात आहे. (new video of stuntman apology went viral by police jalgaon news )
जिपच्या बोनटवर बसुन ‘आला रे आला, मन्या आला’, या गाण्यावरील त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने रान उठवले. त्यानंतर चोविस तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याच्या स्टंटसह माफिनाम्याचा नवा व्हिडीओ बुधवारी (ता. १९) रात्री पोलिसांनी व्हायरल केला.
‘शुट आऊट ॲट वडाला’ या २०१३मध्ये झळकलेल्या चित्रपटातील दृष्याप्रमाणेच पाटील याने स्टंट केल्याची ही घटना मंगळवार (ता. १६) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्ग भेदुन जाणाऱ्या आकाशवाणी चौकात बोलेरो जिपवर (एमएच१९, बीजे ५९५१) बसून पाटील व त्याचे साथीदार अक्षय सपकाळे (वय ३४, रा. खेडी), गौतम यशवंत पानपाटील (वय ३८, रा. सावखेडा) आणि देवेंद्र सोपान सपकाळे (वय २५, रा. आव्हाणे) या चौघांनी मन्या सुर्वे स्टाईल स्टंट करत गर्रर्रकन चौकाला राऊंड मारले.
या स्टंटचा व्हिडीओ देवा सपकाळे याने मोबाईलमध्ये शुट करून सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार चोविस तासांनतर स्टंट करणाऱ्या पाटीलला रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले.
पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर पोलिस नाईक राजेश शिवसींग चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर त्याच्या माफिनाम्यासह पोलिसांनी दुसरा व्हिडीओ व्हायरल केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विठ्ठल भाऽऽईचे कारनामे
विठ्ठल पाटीलच्या पोलिस मित्रांनी यापूर्वी वाहतुक निरीक्षकाच्या दालनात जंगी बर्थ-डे सेलिब्रेशन केले होते. या प्रकरणात दोन पोलिस नंतर निलंबीत झाले. तसेच, कोरोना काळात वाहतूक निरीक्षक कुनगर यांनी वाळू डंपर पकडल्यावर याच विठ्ठलभाईच्या पुढाकाराने वाळूमाफिया या संज्ञेत मोडणाऱ्या समस्त वाळू वाहतुकदारांनी हाच आकाशवाणी चौक जाम करुन आंदोलन करण्याची हिम्मत दाखवली होती. इतकेच नाही, तर पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जावुन त्यांना कॅमेऱ्यासमोर धमकावण्याची हिम्मतही ‘वाळूवाल्यां’नी दाखवली होती.
पुढाऱ्यांचा सखा, पोलिसांचा मित्र
वाळूच्या व्यवसायातील अमाप पैशांनी महसुल आणि पोलिस खात्यातील अनेकांना वाळूमाफिया बनविले आहे. सरकारच्या पगारावर जगायचे आणि वरकमाईवर नातेवाईकांच्या नावे ट्रॅक्टर, डंपर घेवुन विठ्ठलसारख्या वाळूमाफियांच्या ताब्यात देत वाळूचा अवैध धंदा करायचा.
या धंद्याने अनेक पोलिस कर्मचारी गब्बर (मालामाल) झाले आहेत. नोकरीपेक्षा अधिक पटीत पैसा कमावुन देणारा विठ्ठल असो, की इतर कोणीही वाळू माफिया, त्याच्याबद्दलची प्रामाणिकता खाकीपेक्षा अधीकच असते. परिणामी पोलिसांच्या अंगावर धावुन जाण्यासही हे वाळूमाफिया मागेपुढे पाहात नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.