New Year Party  Sakal
जळगाव

New Year 2024: खबरदार, गड- किल्ल्यांवर पार्ट्या कराल तर..! सह्याद्री प्रतिष्ठान ठेवणार वॉच

अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यावर अनेक समाधी तसेच देवी, देवतांची मंदिरे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

New Year 2024: रविवारी (ता. ३१) साजरा केल्या जाणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्‍वभूमीवर गड, किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी पोलिस प्रशासनाने तालुक्यातील गड, किल्ल्यांवर दारु, मटणाच्या पार्ट्‍या करताना कोणी आढळून आल्यास, त्यांच्‍यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे.

(new year 2024 Sahyadri Foundation demanded to take legal action against people partying on forts jalgaon news)

या संदर्भात ग्रामीण पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर संवर्धनाचे कार्य करीत असून या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने आहेत.

अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यावर अनेक समाधी तसेच देवी, देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे हे सर्व गडकिल्ले पवित्र तीर्थस्थाने म्हणून आम्ही मानतो आणि अशा या गडकिल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबरला काही ठरावीक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू, मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करतात. त्या ठिकाणी हिडिसपणे धिंगाणा घालतात. ज्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होते.

गडप्रेमी, शिवप्रेमी ही गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता असते.

तरी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राजदेहरे, कन्हेरगड, मल्हारगड या किल्ल्यांच्या पायथ्याला ३१ डिसेंबरला पोलिसांची गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कोणी करणार नाही.

आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या मार्गदर्शनाखाली मदतीस देखील हजर राहू शकतील असे निवेदनात नमुद केले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. सुंदरडे यांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, दीपक राजपूत, योगेश शेळके, तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र वाघ, पप्पू पाटील, राहूल पवार, बाळासाहेब सोनवणे, मोहन भोळे, मयूर भागवत, जितेंद्र वरखेडे, विलास चव्हाण, शुभम घोरपडे, भाऊसाहेब पाटील, उमेश खेडकर, शुभम निकुंभ, मनोज बयास, आर्यन माळी आदी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT