Jalgaon sakal
जळगाव

जळगावात दिवसभरात नऊ नवे कोरोनाबाधित

जळगावात चार; सक्रिय रुग्णसंख्या १७ वर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग नियंत्रणात येऊन जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असताना, सोमवारी जिल्ह्यात नवे नळ रुग्ण समोर आले. त्यापैकी चार रुग्ण जळगाव शहरात, तर तीन बाधित एरंडोलमध्ये आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १७ वर पोचली आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलैपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तो पूर्णपणे नियंत्रणात आला. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढला असताना, नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अगदीच नगण्य असल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ लागली होती.

सोमवारी दिवसभरात प्राप्त चाचण्यांच्या अहवालातून जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण समोर आले. जळगाव शहरातून चार व एरंडोल येथून तीन बाधित आढळून आले. मुक्ताईनगर व भुसावळ येथून प्रत्येकी एक असे नऊ रुग्ण आढळून आले. सोमवारी अकराशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १७ असून, पैकी केवळ एक रुग्ण गंभीर असून, तो ऑक्सिजनवर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ४२ हजार २७० रुग्ण आढळले असून, एक लाख ४० हजार १७६ रुग्ण बरे झाले आहेत. २,५७७ मृत्यू झाले आहेत.

धुळ्यात महिला कोरोनाबाधित

धुळे : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन अहवालात सोमवारी (ता. १८) धुळे शहरातील ५५ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षणीय कमी झाला असला, तरी एखादं-दोन बाधितांमुळे हा धोका वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन अहवालानुसार सोमवारी जिल्हाभरात ८१६ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील केवळ एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागातील पश्‍चिम हुडकोतील ही महिला आहे. या एका बाधिताबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर ४५ हजार ८८४ झाली. कोरोनामुळे मृतांचा आकडा मात्र स्थिरावल्याने दिलासा आहे. जिल्ह्यात एकूण ६६८ कोरोनाचे बळी गेले आहेत. दरम्यान, अद्याप २७८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सध्या चार सक्रिय रुग्ण असून, दोन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये, एक खासगी हॉस्पिटलमध्ये, तर एक बाधित होम आयसोलेशनमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT