Jalgaon: CA Ravindra Patil, Prof. m. Ms. Salaries etc. esakal
जळगाव

NMU Jalgaon News | सोशल मीडियापेक्षा वाचनावर भर द्यावा : सीए रवींद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सामाजिक माध्यमांचा वापर कमी करून विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिक भर द्यावा. त्यामुळे विचारांच्या कक्षा व्यापक होतील, असे मत विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काढण्यात आलेल्या भित्तिपत्रकाचे विमोचन सीए पाटील, उपवित्त लेखाधिकारी सोमनाथ गोहिल यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मराठी विभागप्रमुख प्रा. म. सु. पगारे अध्यक्षस्थानी होते. (NMU Jalgaon Emphasis should be placed on reading rather than social media say by CA Ravindra Patil Jalgaon News)

श्री. गोहिल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. म. सु. पगारे यांनी संपादनाच्या शिस्तीचे महत्त्व सांगितले. भित्तिपत्रकातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे ते म्हणाले.

भित्तिपत्रकाचे मयूर सोनवणे, सुशीला पावरा, मयूरी लोंढे, आकाश कोंगळे, निशा सपकाळ, विशाल वळवी, गायत्री साळुंखे या विद्यार्थ्यांनी संपादन केले. उज्ज्वला लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT