बाजारात भाजीपाला विकत घेताना ग्राहक esakal
जळगाव

भाजीपाल्याने केले अर्धशतक पार

संजय पाटील

पारोळा (जि. जळगाव) : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत आहे. बाजारात पुरेसा भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने भाजीपाल्याच्या दराने अर्धशतक गाठले आहे. जवळपास सर्वच भाजीपाल्याचा दर एका किलोसाठी ५० रुपयांच्यापुढे आहे. काही दिवसांपूर्वी २० रुपये किलो दराने मिळणारा टमाटा आज ८० रुपये किलोने देखील मिळत नसल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. भाजीपाल्याच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमोडले आहे.

दररोजच्या जेवणात भाजीपाला गरजेचा झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला शेवग्याच्या शेंगांचा दर अत्यंत कमी होता. काही भागातील शेतकऱ्यांना केलेला खर्चही न निघल्याने उभ्या पिकांवर त्यांनी रोटर फिरवले होते. आज तोच शेवगा ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. वातावरणात उन्हाच्या तीव्रता कमालीची वाढल्याने भाजीपाल्याचे पुरेसे उत्पादनच होत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत २० रुपये किलोने विक्री केला जाणारा टमाटा ८० रुपये दराने ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे. एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने एकूणच गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमोडले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना तर भाजीपाला विकत घेणे परवडतच नाही. त्यामुळे किमान जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सध्याचे भाजीपाल्याचे दर (किलोमध्ये)

टमाटे ............. ८० ते १००

हिरवी मिरची ..... ५० ते ६०

चवळी ............ ५५ ते ६०

शेवगा ............. ६० ते ७०

वांगे ............... ४० ते ५०

बटाटे ............. ३० ते ४०

मेथी जुडी .......... ५० ते ६०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "त्यामध्ये काही चुकीचं नाही," नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

IND vs BAN Records : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीत नोंदवले गेले ९ भारी विक्रम, R Ashwin ने वर्ल्ड रेकॉर्ड केला

Navra Maza Navsacha 2 Collection : बॉक्स ऑफिसवर नवरा माझा नवसाचा 2 ची सुस्साट कमाई ! वीकेंडला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

Coldplay मध्ये नेमके कोण-कोण आहेत? त्यांची इतकी क्रेझ का? 'ही' आहेत त्यांची सर्वाधिक गाजलेली गाणी

Supreme Court : पाहणेच नाही तर डाऊनलोड करुन ठेवणेही गुन्हाच! सुप्रीम कोर्टाचा 'चाइल्ड पॉर्नोग्राफी'बाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT