A radium notice board on the facade of the divider in front of the Mahatma Gandhi Multi-Purpose Hall. esakal
जळगाव

Jalgaon News : ...अन् महामार्गावर लागला सूचना फलक

अंकलेश्र्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर सूचना फलक नसल्याने येथील पालिकेच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहासमोर दुभाजकावर वाहने आदळली जाऊन अपघातांची मालिका सुरू होती.

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर : शहरातून गेलेल्या अंकलेश्र्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर सूचना फलक नसल्याने येथील पालिकेच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहासमोर दुभाजकावर वाहने आदळली जाऊन अपघातांची मालिका सुरू होती.

या विषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच पालिकेतर्फे दुभाजकाच्या दर्शनी भागात रेडियमचे दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. (Notice board on Ankleshwar Barhanpur highway jalgaon news)

शहरातून गेलेल्या अंकलेश्वर -बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरून दिवसरात्र जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

याच पार्श्वभूमीवर शहरातून गेलेल्या या महामार्गावर शहरातील यावल रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलापासून ते सुभाष चौकापर्यंत गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी दुभाजक करण्यात आले आहे.

त्या वेळी दुभाजकांच्या दर्शनी भागावर दिशादर्शक फलक व काळे-पिवळे पट्टेही आखण्यात आले.

परंतु हे पट्टे अस्पष्ट झाल्याने रात्रीच्या सुमारास दुभाजक दिसत नसल्याने या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.

या विषयी ‘सकाळ’ ने सचित्र वृत्त प्रकाशित केला. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने या ठिकाणी नुकतेच रेडियमचे दिशादर्शक फलक लावले आहे.

दरम्यान, आता सुभाष चौक ते छत्री चौक व बसस्थानकमार्गे बाजार समिती संकुलापर्यंत दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

तसेच दुभाजकांना काळे-पिवळे रंगाचे पट्टे मारून परिसराची साफसफाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, दुभाजकाच्या दर्शनी भागात एलएडी दिव्याचा खांब व रेडियमचे दिशादर्शक फलक बसविण्याच्या मागणीचे निवेदन येथील एम. मुसा असंघटित गवंडी कामगार व श्रमिक कोहेनूर कामगार संघटनेतर्फे प्रशासक तथा प्रांताधिकारी व पालिकेला देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT