High Court esakal
जळगाव

Jalgaon : उच्च न्यायालयाची धरणगाव नगरपरिषदेतील 20 कोटी गैरव्यवहार प्रकरणी कारणे दाखवा Notice

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : येथील नगरपरिषदेत २० कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत धरणगाव जनजागृत मंच तथा माहिती अधिकारी कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुराव्यासह फौजदारी स्वरुपाची याचिका अॅड. भूषण महाजन यांच्यावतीने दाखल केली आहे.

या याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.(Notice of High Court in 20 crore malpractice case in Dharangaon Municipal Council Jalgaon News)

माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार, धरणगाव नगरपरिषदेच्या लेखा परीक्षण २०१७-१८ आणि २०१८-१९ मधील अहवालानुसार चेतन सोनार (वास्तू विशारद), पद्मालय कन्स्ट्रक्शन, अनंत पाटील, सास्ते कन्स्ट्रक्शन कंपनी, आदर्श सर्व्हिसेस, गजानन इंटरप्राइजेस, ज्ञानेश्वरी कन्स्ट्रक्शन, एस. ए. कन्स्ट्रक्शन, फ्लोवेल कन्स्ट्रक्शन, आशिष डायकेम कॉर्पोरेशन, तत्कालीन अध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध शासकीय दस्तावेजाचे बनावटीकरण, फौजदारी अपहार, न्यासभंग तसेच शासकीय निधीची चोरी अशा सदराखाली गुन्हा नोंदविण्याचे पोलिस निरीक्षक, धरणगाव पोलिस ठाणे यांना आदेश व्हावेत,अशा मागणीची क्रिमिनल रिट याचिका औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केली असून, त्या संदर्भात १८ ऑक्टोबरला सुनावणी झाली.

ही सुनावणी न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या न्यायपीठासमोर झाली असून, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार असून, याचिकाकर्ता जितेंद्र महाजन यांच्यावतीने उच्च न्यायालयात ॲड. भूषण महाजन कामकाज पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT