Employees locking up the municipal office. Along with Provincial Officer and Administrator Jitendra Patil.  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘लेटलतीफ’ सरकारी बाबूंना दणका; अधिकाऱ्यांसह 10 कर्मचाऱ्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील गोपाळनगर परिसरातील नगरपरिषदेच्या कार्यालयात सोमवारी (ता.१७) प्रशासक उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अचानक भेट दिली.

यावेळी प्रथम उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरून नगर परिषदेच्या इमारतीला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचारी कामावर वेळेवर हजर आहेत की,नाही यासंदर्भात प्रत्यक्षात पाहणी केली. यादरम्यान वेळेवर काम न करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली. (Notices were given to 10 officers and employees who did not work on time jalgaon news)

गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त आहेत. सध्याच्या काळात पालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांच्याकडे आहे.

पालिकेच्या संदर्भात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड असल्याने तसेच वेळेवर नागरिकांची कामे होत नसल्याने सोमवारी (ता.१७) सकाळी दहाच्या सुमारास स्वतः उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पालिका कार्यालयाला अचानक भेट दिली व कर्मचाऱ्यास कार्यालयाला बाहेरून कुलूप लावण्यात सांगितले व कार्यालयाच्या आत किती कर्मचारी हजर आहेत, याची तपासणी केली.

कर्मचारी कितीला कामावर येतात व किती वाजता घरी जातात, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच वेळेवर कार्यालयात न आलेल्या अशा दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मूलभूत सुविधांवर भर

शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते व स्वच्छता या तीन गोष्टींना उपविभागीत अधिकारी जितेंद्र पाटील हे प्राधान्य देणार आहेत. स्वतः शहरातील प्रभागांमध्ये फिरून किती विकासकामे झाली. त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल कुठल्या दर्जाचे आहे.

यासंदर्भात त्या - त्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून माहिती संकलन करणार आहे. यावेळी विकासकामांमध्ये जो दोषी आढळून आला, त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या विकासकामांबाबत कुणाचेही एकूण घेतले जाणार नाही. सबंधितांना सरळ कारवाईस समोरे जावे लागणार आहे.

नागरिकांसाठी हेल्पलाईन

उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने लवकरच नागरिकांसाठी हेल्पलाईन बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या हेल्पलाईनद्वारे आपल्या प्रभागात घंटागाडी, साफसफाई, नालेसफाई, सार्वजनिक शौचालय सफाई त्याचप्रमाणे विकासकामांसदर्भात अडीअडचणी असल्यास लवकरच हेल्पलाईनच्या माध्यमातून आपली तक्रार मांडण्याची संधी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांसाठी उपविभागीय अधिकारी तथा पालिका प्रशासक जितेंद्र पाटील उपलब्ध करून देणार आहेत. जोपर्यंत निवडणूक लागणार नाही, तोपर्यत हा कार्यक्रम नियमित सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT