Jalgaon Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : अमळनेर मतदार संघात 3 लाखांवर मतदार

विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या मंगळवारपर्यंत (ता. २३) ३ लाख ६९० झाली असून, शहरातील चार मतदान केंद्रे इमारत नादुरुस्त व धार्मिक स्थळ जवळ असल्याने स्थलांतरित करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या मंगळवारपर्यंत (ता. २३) ३ लाख ६९० झाली असून, शहरातील चार मतदान केंद्रे इमारत नादुरुस्त व धार्मिक स्थळ जवळ असल्याने स्थलांतरित करण्यात आले आहेत तर सहा मतदान केंद्रांची नावे बदलण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली. (number of voters in Amalner constituency is 3 lakh jalgaon news)

मतदार यादी २३ जानेवारीला अद्ययावत करण्यात आली.

अमळनेर विधानसभा मतदार संघात १ लाख ५५ हजार ९४ पुरुष मतदारांची तर १ लाख ४५ हजार ५९४ महिला मतदार आहेत. महिला पुरुष मतदारांचे लिंग गुणोत्तर ९३२ वरून ९३७ पर्यंत वाढले आहे. इतर दोन मतदार नोंदविण्यात आले आहेत.

वर्षभरात ८ हजार ५२७ नव्या मतदारांची नोंदणी झाली तर ६ हजार २१६ मतदारांची वगळणी झाली आहे. त्यात सारख्या फोटोवरून ८५८ दुबार मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यातून ३४० वगळण्यात आले आहेत.

काहींचे चुकून फोटो लागले होते. तसेच सारख्या नावावरून २ हजार ६० मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यात २०४ नावे वगळण्यात आले आहेत. फोटोवरून दुबार नावे वगळण्याची प्रमाण ३९ टक्के तर नावावरून वगळण्याचे प्रमाण १० टक्के आहे.

अमळनेर मतदार संघात शहरात ८१, ग्रामीण भागात १८९ तर पारोळा तालुक्यातील ४० गावात ५० असे एकूण ३२० मतदान केंद्रे आहेत. २ हजार २६ दिव्यांग मतदार आढळून आले. तर ८० वर्षावरील ९ हजार ४७८ मतदार आढळून आले.

सेवेत असलेले १ हजार ११ मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्यांना ऑनलाईन मतदान पत्रिका त्यांच्या कार्यालयात पाठविण्यात येईल. त्यांनी त्यांच्या कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत गोपनीय मतदान करून ती पत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवायची असते, असेही प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले.

‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’ प्राप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३२ ईव्हीएम व ३२ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. सर्व ३२० मतदान केंद्रांवर दोन मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांमध्ये विश्वास तसेच तहसील आवारात नागरिकांसाठी व मतदारांसाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या प्रसंगी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, अनंत निकम, यशवंत बैसाणे, महेंद्र बोरसे हजर होते.

"एखाद्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळल्यास व दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल." - महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT