Dilapidated municipal building. 
जळगाव

Jalgaon News: दुकान खाली करण्यासाठी व्यापाऱ्यांना ‘अल्टिमेटम’; भुसावळमधील जीर्ण इमारत पाडणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील नगरपालिकेची जुनी इमारत जीर्ण झाली असून, गेले दहा ते पंधरा वर्षांपूर्वी जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन इमारतीला जमीनदोस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या इमारतीच्या समोरील बाजूस रस्त्याने लागून व्यापाऱ्यांची दुकाने आहेत.

यामुळे हे प्रकरण प्रलंबित होते. मात्र पालिका या प्रश्‍नावर ॲक्शन मोडवर आली असून, मंगळवारी (ता.२१) उपविभागीय अधिकारी तथा पालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांनी पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना अंतिम नोटीस बजाविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तीन दिवसांनी पालिका प्रत्यक्ष कार्यवाही करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (old building in Bhusawal will be demolished jalgaon news)

ही नगरपालिका इमारत जीर्ण झाल्याने गेले पंधरा ते वीस वर्षांपासून पालिकेचा कारभार गोपाळनगरमधील सांस्कृतिक सभागृहामधील इमारतीमधून सुरू आहे. या पालिकेच्या जीर्ण इमारतीखाली एकूण २२ दुकाने सुरू आहेत. यामुळे हे प्रकरण प्रलंबित होते. मात्र उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अंतिम नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच तीन दिवसांत व्यापाऱ्यांना दुकाने खाली करावी. जेणे करून पालिका जीर्ण इमारत सोबत २२ दुकाने सुद्धा जमीनदोस्त करण्यात येईल, यावेळी झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही. या आधीही व्यापाऱ्यांना दोन वेळा नोटीस बजावण्याच्या आल्या आहेत. तसेच शहरातील मरिमाता मंदिरासमोरील एक इमारत, पंजाब बँकसमोरील लायेवाला यांची इमारत तसेच चोरसिया यांची इमारत, विठ्ठल मंदिरासमोरील इमारत असे पालिका प्रशासकाकडून जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

तसेच कपडा मार्केटसमोर लावण्यात येणाऱ्या हातगाड्या नेहरू मैदानात लावण्यात येणार आहे. जेणे करून शनी मंदिर वॉर्ड, खडका रोड, पापानगर भागातील नागरिकांना रस्ता मोकळा झाल्याने सहज आपला प्रवास करता येणार आहे. बुधवारी (ता.२२) उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात हातगाडी व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे तर दोन दिवसांनी फळ विक्रेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

थकबाकीदारांवरही होणार कारवाई

पालिकेची अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या थकबाकीदार गाळेधारकांना अनेक वेळा नोटिसा देऊनही वसुली होत नसल्याने पालिकेने आता कडक धोरण आखले आहे. हा कटू प्रसंग येण्याआधीच थकबाकी भरावी, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तसेच शहरात २१ हजार अधिकृत तर ५ हजारांपेक्षा जास्त अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. अनधिकृत कनेक्शन ज्यांना अधिकृत करून घ्यायचे असतील, त्यांना एका मिनिटात नियमानुसार करून देण्यात येणार आहे. अन्यथा अवैध नळ कनेक्शन त्वरित कट केले जाणार आहे.

हॉकर्स झोन

बाजारपेठ परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची समस्या आहे. यामुळे अनेक वेळा वादही उद्‌भवतात. यासाठी हॉकर्स झोन नेहरू मैदानावर हलविण्यात येणार आहे. बाजारपेठमध्ये ठिकठिकाणी फळ व भाजीपाला विक्रेते दिसून येतात. त्यांना बाजार समितीमध्ये हलविण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली.

दरम्यान, प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला. रेल्वे स्टेशन समोरची पालिकेची जीर्ण इमारत पाडण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. यासह अवैध नळ कनेक्शन, मालमत्ता कराची थकबाकी वसुली, तसेच प्रभागनिहाय स्वच्छतेसाठी मुकादम नियुक्‍त केले जाणार आहे. प्रभागनिहाय घंटागाडी केरकचरा जमा करणार आहे. सुविधेसाठी संबंधितांचे भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांना देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT