esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जुन्या वादातून दोन कुटुंबात घमासान; विवाहितेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आव्हाणे (ता. जळगाव) येथील मशिदीत मौलानाला नेमणुकीवरुन दोन कुटुंबियात टोकाचे वाद आहेत. वादातूनच रविवारी (ता. २१) रात्री घमासान हाणामारी झाली.

परस्पर विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे तालुका पोलिसांत दाखल झाले आहेत. (old dispute between two families jalgaon crime news)

३९ वर्षीय विवाहिता पतीसोबत जात असताना, संशयितांनी त्यांना अडविले. ‘तुमची दोघांची इतकी हिंमत’, असे बोलून पीडितेचा विनयभंग केला. हा प्रकार गावात कोणाला सांगितला, तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी उमरअली पिंजारी, इरफान युनूस पिंजारी, शेख कय्यूम शेख रशीद, अरबाज अलाउद्दीन खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

‘तुम्ही मुळ या गावाचे नसून दुसऱ्या गावाहून आमच्या गावात राहण्यासाठी आले आहेत. मशिदीत मैलाना नियुक्तीच्या वादात तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? तुम्हाला जास्त झाले आहे, अशी धमकी देऊन संशयित झाकीर सय्यद रज्जाक याने २८ वर्षीय पीडितेचा विनयभंग केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयित फरीद सय्यद रज्जाक, मंजूर सय्यद गफुर, इमरान खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून तुझ्या पतीला व दिराला समजावून सांग नाही, तर त्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, तसेच फिर्यादीची सासू सकीना हिलाही शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे याचे दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार लिलाधर महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT