Jalgaon Government Medical College and Hospital esakal
जळगाव

Jalgoan News : वृद्धेस पाठविले खासगीत; ‘जीएमसी’ उरले नावा पुरतेच!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हृदयविकाराच्या त्रासाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात मोठ्या आशेने आलेल्या वृद्धेला सुविधा नाही, म्हणून खासगी हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, खासगीत दाखल केल्यानंतर काही वेळेतच या महिलेने प्राण त्यागले. (old lady who had come to Government Medical College due to heart disease requested by doctor to go private hospital jalgaon news)

या घटनेमुळे कोणत्याही सुविधा नसलेले ‘जीएमसी’ केवळ नावापुरतेच आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊन शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्यात.

शहरातील शाहूनगर पाणी टाकीजवळील रहिवासी कुसुमबाई सदाशिव शेळके (वय ६०) मंगळवारी (ता. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना मुलगा गणेश व मुलगी जया यांनी जिल्हा रुग्णालयात आणले.

सुविधा नसल्याने ‘खासगी’चा सल्ला

रात्री बाराच्या सुमारास जिल्‍हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इर्मजन्सी वॉर्डात आणल्यावर कुसुमबाई यांच्या तपासणीत ईसीजी पाहिल्यावर हजर डॉक्टरांनी उपचाराला सुरवात न करता ‘या ठिकाणी सुविधा नसल्याने खासगी रुग्णालयात घेऊन जा.

तेथे योजनेत तुमचे काम होऊन जाईल’, असे सांगत रवाना केले. तशाच अवस्थेत बहीण-भावाने आईला खासगी रुग्णालयात हलविले. तेथे तपासणी होऊन दाखल करून घेतल्यानंतर काही वेळेतच कुसुमबाई यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

वेळेत उपचार झाले असते तर..

सिव्हिलमध्ये आणल्यावर येथे इसीजी काढून उपचार न करताच डॉक्टरांनी सुविधा नसल्याचे सांगत रवाना केले. वेळीच माझ्या आईवर सिव्हीलमध्येच उपचार झाले असते, तर ती आज जिवंत असती, असे सांगत गणेशने अश्रूंना वाट करून दिली.

‘गोल्डन अवर’ वाया

हृदयविकाराच्या जनजागृतीसाठी शासन स्तरावर खूप प्रयत्न सुरू आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने काय व कसे उपाय करावेत, काय खबरदारी घ्यावी, तातडीने उपचार होणाऱ्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार झाले, तर प्राण वाचविता येतात, अशा सर्व सेवा सुविधांची जननी असलेल्या जिल्‍हा सामान्य रुग्णालयात आवश्‍यक सुविधा नसल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

"शेळके नामक रुग्ण महिलेचे दोन वेळा ‘इसीजी’ काढले आहेत. त्यावरून त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे दिसून आले. त्यावर कार्डिओलॉजिस्ट तातडीचे उपचार करू शकतो. मात्र, आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही. त्यासाठी रुग्णाला बाहेर उपचार घेण्याचा सल्ला दिला असेल. याबाबत डॉ. परेश जैन यांच्याकडून माहिती घेतो." -डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT