Ganeshotsav 2023 : मंगळवारपासून (ता. १९) गणरायाचे हर्षोल्हासात आगमन झाले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या सणासाठी जिल्हा पोलिस दलाने गेल्या काही महिन्यांपासुन कंबर कसून तयारी केली अन् त्याचेच फलीत म्हणजे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यास मदत होणार आहे.
अशांतता माजवणारे, सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि गुन्हेगारी, खुनशी वृत्तीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसदलाने वेळीच कारवाई करुन जायबंदी केले. त्यात अडीच हजारावर प्रतीबंधक कारवाई, ६५ तडीपार आणि डझनावर एमपीडीए (स्थानबद्ध) करुन गणेशोत्सवावरील विघ्न खाकीने दुर केले आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
उत्सव निर्विघ्नतेसाठी ‘वॉर रुम’
जनसामान्यांसह महिला, बालकांना गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लूटता यावा यासाठी जिल्हा पोलिस दल गेल्या तीन महिन्यांपासुन अथक परिश्रम करत आहे. जिल्ह्यातील सर्वच ३५ पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हेशाखा, अप्पर पोलिस अधीक्षक आणि स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक यासाठी कार्यरत होते.
गुन्हेशाखेतर्फे तर, यासाठी वॉररुम तयार करुनच एमपीडीए- स्थानबद्धता आणि हद्दपारीचा सपाटाच लावला आहे. तो, अगदी गणेश चतुर्थीपर्यंत कायम राहिला. रेकॉर्डवरील गुन्हेगार, तसेच उपद्रवी २ हजार ३४६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. डझनावर स्थानबद्ध आणि ६५ गुन्हेगार जिल्ह्याच्या बाहेर रवाना करण्यात आले आहे.
दोन हजारांवर मंडळं
कोरोना काळानंतर गणेशोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, जिल्ह्यात दोन हजार ७८१ मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १ हजार ९३५ सार्वजनिक गणेश मंडळं आणि ६९१ खासगी मंडळं आहेत. जळगाव शहरात ३७१ गणेश मंडळं आहेत. या मंडळांची सुरक्षा कार्यकर्त्यांसह पोलिसदलाकडे आहे. परिणामी पोलिस बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दलाच्या जोडीला एसआरपी, सीआयएसएफ, होमगार्ड यांचा अतिरिक्त बंदोबस्त प्राप्त झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशी आहेत मंडळं
सार्वजनिक : १९३५
खासगी : ६९१
एक गाव एक गणपती : १५५
प्रतिबंधात्मक कारवाया
प्रकार कारवाईची संख्या
१०७ ७०६
११० २७३
१४४ (२) ४०६
१४९ ७३०
मुंबई पोलिस
९३ : १५४
५५ : ३५
५६ : १८
५७ : १२
एमपीडीए - १२
बाहेरुन दाखल झालेला बंदोबस्त
एसआरपी : १ कंपनी
सीआयएसएफ : १
नवप्रविष्ट कॅडेट : ८
नवप्रविष्ट कर्मचारी : पुरूष- २००, महिला- १००
होमगार्ड : पुरूष- १५००, महिला- २००
स्थानिक बंदोबस्त
पोलिस अधीक्षक : ०१
अपर पोलिस अधीक्षक : ०२
पोलिस उपअधीक्षक : ०८
यासह पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अमलदार (पुरुष व महिला), आरसीपी प्लाटून, स्ट्रायकींग फोर्स, क्युआरटी पथक असा साडेतीन हजार कर्मचारी, अडीचशे निरीक्षक आणि साडेतीनशे उपनिरीक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दिवसनिहाय विसर्जन
दिवस मंडळ संख्या
तिसरा ४
पाचवा १८१
सहावा ३
सातवा ४१६
आठवा ३१
नववा १५५
दहावा १,९६५
अकरावा २६
"गणेशोत्सवासाठी पोलिस दलाने आगोदरच कारवाई करुन उपद्रवी समाजकंटकांना जिल्ह्यातून पिटाळून लावले आहे. संवेदनशिल गाव-तालूक्यांवर विषेश लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळावर सिसीटीव्हीची नजर राहिल.
जनतेने अफवांना बळी पडू नये. खास करुन तरुणांनी व्हॅाटस्ॲप, सोशल मीडियावरील पोस्टवर व्यक्त न होता पोलिसांशी संपर्क करावा. सायबर तज्ज्ञ त्यासाठी तत्पर आहेत. गणेशोत्सवात खास करुन महिला-तरुणींना सहभागी करुन घेण्याचे आवाहन प्रशासन आणि गणेश महामंडळांतर्फे करण्यात आले आहे." -एम. राजकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.