Farmer Waiting For Rain esakal
जळगाव

Jalgaon News : उदीड, मूग, तुरीच्या पेरण्यांवर यंदा परिणाम होण्याची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जून महिना सुरू होऊन १६ दिवस झाले, तरीही पावसाची ओढ कायम आहे. मृग नक्षत्र निघून आठवडा झाला, तरीही मृगातील दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.

पावसाळा सुरू झाला, तरीही तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागले आहे. वातावरणात उकाडा कायम आहे. त्यामुळे पाऊस येणार तरी कधी? याची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच भेडसावू लागली आहे. (On sowing of urad gram turi Chances of results year Deer Nakshatra is gone but rains are still pouring Farmers are worried Jalgaon News)

जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. खरिपाच्या पेरण्यांवर शेतकऱ्यांची दिवाळी अवलंबून असते. खरिपासाठी मृग नक्षत्रातील पाऊस उपयुक्त मानला जातो. यंदा मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन नऊ दिवस झाले तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही.

सुरवातीच्याच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास शेतकरी जूनअखेरपर्यंत उडीद, तुर व मुगाची पेरणी करतात. त्यानंतर पेरणी करण्याचे शक्यतो टाळतात. जुलैअखेरपर्यंत तूर आणि सोयाबिनची पेरणी करतात. पाऊस लांबला, तर उडीद आणि मूगाच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरिपातील प्रमुख पिके सरासरी क्षेत्र (हेक्टर)

* कापूस : ५ लाख १ हजार ५६८

* सोयाबीन : २९ हजार ६३८

* तूर : १६ हजार ५०३

* मका : ९८ हजार २५

* उडीद : २६ हजार ३१२

* मूग : २८ हजार ९६

* ज्वारी : ४४ हजार ७३३

* बाजरी : १५ हजार ७७४

* दाळी : ७१ हजार ९८२

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"थांबलेल्या पावसाचा परिणाम कापसासह फळबागांवर, उडीद, तुर व मुगावर होण्याची शक्यता आहे. खरिपासाठी आवश्यक असलेली तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांनी शंभर मिलीमिटर पाउस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT