Murder esakal
जळगाव

Jalgaon Crime : शिवीगाळ केल्याच्या संशयावरून लोखंडी रॉड मारून एकाचा खून; 3 संशयित अटकेत

या प्रकरणी मंगळवारी (ता. १६) सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (ता. यावल) : रिधुरी (ता. यावल) येथे शिवीगाळ करीत असल्याच्या संशयावरून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून ठार केल्याची घटना सोमवारी (ता. १५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मंगळवारी (ता. १६) सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पिळोदा येथे मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच चोवीस तासांत तालुक्यात दुसरी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. (One killed by iron rod on suspicion of molestation 3 suspects arrested Jalgaon Crime)

रिधुरी (ता. यावल) येथे सोमवारी (ता. १५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास धनराज वासुदेव पाटील (सोनवणे) (वय ४०) हे जनावरांच्या गोठ्यात कामानिमित्त ‘जेसीबी’ चालकाशी मोबाईल फोनवरून बोलत असताना थट्टा मस्करी करीत होते.

तेव्हा आरती सतीश सोनवणे यांना वाटले की, त्यांचे पती सतीश सोनवणे यांनाच शिवीगाळ करीत आहे. याच संशयावरून संशयित सतीश सुकदेव सोनवणे याने धनराज वासुदेव पाटील (सोनवणे) (वय ४०) यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना ठार केले.

तसेच मृताची पत्नी, मुले व सासरे यांना संशयित युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे यांनी लाकडी काठ्यांनी तर संशयित आरती संतोष सोनवणे, मीना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे यांनी चापटाबुक्यांनी लाथांनी मारहाण करून त्यांना दुखापत केली.

यात वसंत झाबरू सोनवणे, सोनी धनराज सोनवणे, वैष्णवी धनराज सोनवणे, ओम धनराज सोनवणे हे जखमी झाले आहे.

याबाबत सोनी धनराज सोनवणे (रा. रिधुरी) यांनी फैजपूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून संशयित सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे, आरती सतीश सोनवणे, मीना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे (सर्व रा. रिधुरी, ता. यावल) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांना पाच दिवसांची कोठडी

संशयित सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना मंगळवारी (ता. १६) न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, हवालदार राजेश बऱ्हाटे, देविदास सूरदास, विकास सोनवणे, उमेश चौधरी, रवींद्र मोरे, विजय चौधरी, अरुण नमायते घटनास्थळी दाखल झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT