Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime : तांबापुरात भोसकून एकाचा खून; सिकलगर वाड्यात तुफान दगडफेकीसह उसळली दंगल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तांबापुरा परिसरातील शिरसोली नाक्याजवळ दोन गटांत तुफान दगडफेक होऊन दंगल उसळल्याची घटना मंगळवारी (ता. २५) रात्री दहाच्या सुमारस घडली. सिकलगर वाड्यात दोन गटांत तलवार, कुऱ्हाडीचा मुक्त वापर होऊन एकाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संजयसिंग प्रदीपसिंग टाक असे मृताचे नाव आहे. (One killed by stabbing in Tambapur riot broke out in Sikalgarh Wada with stormy stone pelting Jalgaon Crime News)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबापुरा येथील सिकलगर वाड्यात दारूच्या नशेतील दोघांच्या भांडणाचा विपर्यास होऊन दोन गट समोरासमोर ठाकले. कुऱ्हाडी, कोयते, चाकू, तलवारींसह दोन गट एकमेकांवर चाल करून गेल्यानंतर शिरसोली रोड परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ताफा घटनास्थळावर धडकला.

मात्र, दोन्ही बाजूने होणारी तुफान दगडफेकीमुळे पोलिसांना स्वतःचा बचाव करणे अगोदर आवश्यक असल्याने सावध पवित्रा घेत सायरनच्या मदतीने जमाव पांगविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अतिरिक्त पोलिस कुमक धडकल्यावर पोलिसांनी गर्दीत शिरून जखमींना जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. त्यातील संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय ३०) या तरुणावर शस्त्रांनी हल्ला झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. त्याचा मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आला.

कुटुंबीयांचा आक्रोश अन्‌ तणाव

दंगलीत जखमीचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीय आणि नातेवाइकांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. मृत्यूची खात्री झाल्यानंतर एक गट संतप्त होत परत तांबापुराच्या दिशेने गेला. परिणामी, पोलिसांचीही धावपळ उडाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह इतर पोलिस ठाण्यांचे निरीक्षकांसह नियंत्रण कक्षातील अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळावर आणि जिल्‍हा रुग्णालयात तैनात करण्यात आली.

मारेकऱ्यांचा शोध सुरू

संजयसिंग टका याला शस्त्रास्त्रांनी भोसकणाऱ्या संशयितांची माहिती कुटुंबीयांकडून आणि प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. सेानूसिंग आणि मोनूसिंग यांच्या नावाची चर्चा असल्याने त्यांचाही पोलिस शोध घेत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT