Jalgaon News : तालुक्यातील अभोणे तांडा येथील वन विभागाच्या हद्दीत ‘एक गाव एक तलाव’ कामास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. या तलावामुळे साधारणत: १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सेवा सहयोग फाउंडेशन (पुणे) व नेक्सस मॉल यांच्या आर्थिक सहकार्याने व लोकसहभागातून हे काम सुरू आहे. (One Village One Lake at Abhona Tanda Commencement of work One hundred hectares of land in area will come under irrigation Jalgaon News)
ग्रामस्थांनी गावात गावसभा घेऊन पूर्णपणे कामाचे नियोजन करून प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. सुरुवातीला मुख्य बांधाची साफसफाई करण्यात आली.
लोकसहभागातून ट्रॅक्टरद्वारे शिफ्टींगच्या साहाय्याने गाळ बांधावर टाकून बांधाची उंची वाढविण्यात आली. बांधाला मोठ्या प्रमाणात लिकेज असल्यामुळे तांत्रिक पद्धतीने बांधाचा लिकेज काढण्यासाठी काळी माती, खारी मातीचे नियोजन करण्यात आले.
या संकल्पनेनुसार तलावाच्या आजूबाजूच्या १० विहिरींची पाणी पातळी मोजण्याचे काम देखील प्रगती पथावर आहे. या तलावाची लांबी १०० मीटर व रुंदी ५० मीटर असून, त्याचे पहिल्या टप्प्याचे खोलीकरणाचे देखील प्रगतिपथावर आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आभोणे तांडा गावात विविध कंपनीच्या मदतीने साधारण २०१९ पासून सातत्याने जल संधारणाची कामे सुरू आहेत आणि याचाच एक फायदा म्हणून गावाच्या आजूबाजूने नदी, कॅनल असे काहीही जात नसताना देखील मे अखेर विहिरींना पाणी आहे.
२०१९ च्या आधी मार्च- एप्रिल महिन्यातच पाण्याची विवंचना सुरू व्हायची मात्र सातत्याने जल संधारण कामामुळे गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे.
भूजल अभियानाच्या अंतर्गत २०१९ मध्ये आभोने तांडा या गावाने पाणी फाउंडेशन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता आणि तेव्हापासून सातत्याने गाव पर्यावरण समृद्धीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.