Onion  esakal
जळगाव

Onion Crisis : कांद्याने केला वांधा; उत्पादन खर्चही निघेना! अनुदानाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

वावडे (जि. जळगाव) : सध्या नवीन कांदा बाजारात आलेला आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला प्रतिकिलो अवघा ५ ते ६ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चन निघणेही अवघड झाले आहे.

कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. (Onion Crisis No production costs Demand for grant farmer agriculture jalgaon news)

तालुक्यातील वावडेसह परिसरात अनेक शेतकरी कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिके घेत आहेत. लाल कांद्याचे उत्पादन यंदा चांगलेच वाढले आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे.

एकीकडे कांदा उत्पादन वाढलेले असताना दुसरीकडे सध्याच्या बाजारभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील दुरापास्त झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने केली जात असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अल्प दरामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली. जात आहे. परंतु आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विक्री करावा लागत आहे.

नियोजन बिघडले

शेतकऱ्यांनी महागड्या दराने कांद्याची रोपे घेऊन कांद्याची लागवड पूर्ण केली आहे. यंदा कांदा लागवडीला मजूरवर्गाची देखील तुटवडा भासल्याने कांदा लागवडीचा दर प्रतिएकर १५ ते १७ हजार रुपयांच्या पुढे गेला होता. दरम्यान, कांदा लागवड झाल्यापासून प्रत्येक महिन्याला वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकाला फटका बसला आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

वाढता उत्पादन खर्च व कमी झालेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामळे कांद्याचे दर वाढवून मिळावेत, निर्यात वाढीला चालना मिळावी, कांद्याला हमीभाव मिळावा, यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

कांदा मातीमोल भावाने विकला जात असल्याने कांद्याला हमी भाव मिळावा, अशी शेतकऱ्याची रास्त अपेक्षा आहे. औषधे, खते व बियाणे यांचे वाढते बाजार तसेच मजुरीचे दर वाढल्याने व कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

विजेची टंचाई सुरू आहे. रोहित्र खराब झाले तर ते लवकर मिळत नाही. अशा अनेक प्रश्‍नावर सरकार गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

"सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आणि महागड्या दराने कांद्यावर औषधाची फवारणी करून कांदे जगविले आहेत; परंतु योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे."

- युवराज सोनवणे, कांदा उत्पादक, शेतकरी वावडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT