जळगाव : लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून योगेश्वरनगरातील विवाहितेची ५१ हजार १५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. योगेश्वरनगरात कांचन आसाराम मासरे (वय २९) वास्तव्यास आहेत.
२७ ऑक्टोबरला दुपारी विवाहितेच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपल्याला २५ हजार रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. हे खोटे असल्याचे समजताच विवाहितेने फोन कट केला. (Online cheating of married people by pretending to be a Lottery Jalgaon Crime News)
मात्र, पुन्हा दुसऱ्या अनोळखी नंबरवरून फोन आला. त्या वेळी समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले, की तुमच्या व्हॉट्सॲपवर त्यांच्या कंपनीचे पॉम्प्लेट टाकले असून, त्यावर केबीसी असे नाव सांगितले. यामुळे त्या व्यक्तीवर विवाहितेचा विश्वास बसला.
त्यामुळे समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे विवाहितेने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार एकूण ५१ हजार १५० रुपये ऑनलाइन टाकले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने मंगळवारी (ता. ८) दुपारी बाराला दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.