Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा ऑनलाइन चुना

शहरातील टेलिफोन नगरातील व्यापाऱ्याला रसायन व्यवसायात गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील टेलिफोन नगरातील व्यापाऱ्याला रसायन व्यवसायात गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला.

सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (online extortion of five half lakh to businessman Jalgaon Cyber ​​Crime)

आश्विन केशवलाल पटेल (वय-४०) असे तक्रारदाराचे नाव आहे. पटेल यांना फेसबुकवरील व्हिक्टोरिया ओव्हेन यांनी त्यांच्याशी व्हाट्सअप क्रमांकावरून (२७ नोव्हेंबर ते १० जानेवारी दरम्यान संपर्क साधून एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्यांचा विश्वास संपादन करून आश्विन पटेल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्विन पटेल यांनी शनिवार(ता.१३) जानेवारीला सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT