Girna Dam esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage : गिरणा धरणात 27 टक्केच जलसाठा! पाणीटंचाईचे सावट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सतत चार वर्षांपासून शंभर टक्के भरणाऱ्या आणि निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. सद्यःस्थितीत धरणात अवघा २७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. (only 27 percent water storage left in Girna Dam jalgaon news)

हा जलसाठा धरणाच्या पाऊण टक्केच असून उन्हाची तीव्रता, पाण्याचे झपाट्याने होणारे बाष्पीभवन आणि पावसाळा सुरू होण्यास लागणारा महिन्याचा अवकाश पाहता, धरणात कितपत जलसाठा शिल्लक राहील असा प्रश्न पुढे आला आहे. दुसरीकडे मन्याड या मध्यम प्रकल्पात केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर चाळीसगाव तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांचा जलसाठा हा शून्यावर गेला आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण सलग चार वर्षांपासून शंभर टक्के भरत आहे. २०१८ मध्ये या धरणाचा पाणीसाठा अवघा ४८ टक्के होता. २०१९ मध्ये तो पुरता घसरून १९ टक्क्यांवर आला होता.

दुष्काळाची झळ सोसणाऱ्या गिरणा पट्ट्यासह जिल्ह्याला सलग चार वर्षे धरण भरल्याने जीवदान मिळाले होते. गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यामध्ये पिण्याची टंचाई दूर होण्यास मदत होते. शिवाय हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

एकच आर्वतनाची शक्यता

गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दलघफूट इतकी आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत गिरणेतील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यंदा तो २७ टक्क्यांवर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत धरणातील पाणीसाठा पाहता, पावसाळा लांबल्यास गिरणा पट्ट्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

धरणातून आतापर्यंत सिंचनासाठी तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता सिंचनाचे आवर्तन सोडणे शक्य नसले तरी पिण्यासाठी मात्र आणखीन एक आवर्तन सोडले जाऊ शकते. मात्र, या संदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाचे कुठलेही नियोजन नसल्याचे दिसत आहे.

नऊ लघु प्रकल्प कोरडेठाक

मागीलवर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मन्याड मध्यम प्रकल्पासह १४ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प शंभरटक्के भरले होते. मात्र, आज या सर्व प्रकल्पांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकाही लघु प्रकल्पात दहा टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा नाही. नऊ प्रकल्पांमध्ये तर शून्य टक्के जलसाठा असून चार प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे.

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. गिरणापाठोपाठ मन्याड धरण तालुक्याला वरदान ठरले आहे. मन्याड धरणही शंभर टक्के भरले होते. आज हे धरण १७ टक्क्यांवर आले आहे. एकूणच गिरणा परिसरावर पाणीटंचाईचे सावट दिसून येत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्पांमधील सद्यःस्थितीत असलेला जलसाठा

धरणाचे नाव साठा (टक्केवारी)

गिरणा ............ २९.२

मन्याड ........... १७

खडकीसीम ....... ७

वाघले- १ ........ ०

पिंपरखेड .......... ४

कुंझर- २ .......... ०

वाघले- २ ......... ०

वलठाण ............ ०

राजदेहरे ............ ०

पथराड ............. ०

कृष्णापुरी .......... १०

हातगा- १ ......... ०

ब्राह्मणशेवगे ....... ०

देवळी-भोरस ...... ०

बोरखेडा ........... ०

पिंप्री उंबरहोळ ..... ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT