Stray Dog Sterilization : शहरात मोकाट कुत्र्यांच्या चाव्यात आबालवृद्धांसह अनेक जण जायबंदी होत असताना महापालिका प्रशासन मात्र या समस्येबाबत कमालीची उदासीन आहे.
मनपाच्याच माहितीनुसार शहरात सुमारे २० हजारांवर मोकाट कुत्रे असून, त्यांच्या निर्बीजीकरणावर तीन वर्षांत दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे हा खर्च नेमका गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे कुत्र्याच्या चाव्याने रेबीज झालेल्या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली. या घटनेच्या व्हिडिओने अनेकांचे मन हळहळले. (Over 20000 stray dogs in Jalgaon news)
मात्र, जळगाव शहरातही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून, महापालिका प्रशासन केवळ कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावरील खर्च दाखविण्यापलीकडे ठोस उपाययोजना करायला पुढे येत नाही.
शहरात अनेक घटना
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील विविध भागात अनेक बालके, नागरिक, महिला-पुरुषांसह वृद्धही जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अयोध्यानगरात कुत्र्याच्या हल्ल्यात एकाच भागातील जवळपास आठ-दहा बालके जखमी झाली होती. इतर भागातूनही कुत्रे चावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. रस्त्यावरील कुत्रे वाहनाच्या मागे लागल्याने अनेक अपघातही घडत असून, मनपा प्रशासन या प्रश्नावर ढीम्म आहे.
शहरात २० हजार मोकाट कुत्रे
माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी यासंदर्भात महापालिकेकडे माहितीच्या अधिकारान्वये प्रश्न विचारले असता, त्यातून गंभीर माहिती समोर आली आहे. मनपाच्या २०१९ च्या नोंदीनुसार शहरात सुमारे २० हजार मोकाट कुत्री आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मक्ता नंदुरबार येथील नवसमाज बहुउद्देशीय संस्थेस देण्यात आला असून, या संस्थेने गत तीन वर्षांत शहरातील १९ हजार ९८९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आल आहे. या कामापोटी संस्थेस मनपाने आतापर्यंत एक कोटी ८४ लाख ६८ हजार २८२ रुपये अदा केले आहेत. म्हणजे, जवळपास दोन कोटींचा निधी त्यावर खर्च करण्यात आला आहे.
...तरीही कुत्री कायम
जळगाव शहरातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. उलटपक्षी तीन वर्षांपूर्वी जेवढी कुत्री होती, त्यापेक्षा अधिक कुत्री आता दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, जळगाव शहरातील प्रत्येक भागात, प्रत्येक वस्तीत, गल्ली-बोळांत तसेच मुख्य रस्त्यांवर, अगदी मनपाच्या व्यापारी संकुलांमध्येही कुत्र्यांचा उपद्रव कायम आहे.
पाळीव कुत्र्यांची माहिती नाही
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कायम असताना काही घरांमध्ये कुत्री पाळली आहेत. मात्र, या पाळीव कुत्र्यांबाबत मनपाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ज्यांनी कुत्री पाळली आहेत त्यांना मनपाकडे ठराविक कर जमा करावा लागतो. मनपाकडे अशा प्रकारच्या करवसुलीचीही माहिती नाही.
म्हणजे, पाळीव कुत्र्यांबाबत सर्वेक्षण झालेले नाही किंवा संबंधित कुत्र्यांच्या मालकांना नोटिसाही बजावलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, कुत्री पाळणारे त्यांचे हौशी मालक त्यांच्या कुत्र्याला शौचासाठी इतरांच्या प्लॉटमध्ये, रस्त्यावर अथवा खुल्या जागेत घेऊन अन्य नागरिकांना त्रास होईल, असा प्रकार करतात. अशा मालकांवरही कारवाई करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.