Pachora - Bhadgaon Agricultural Produce Market Committee  esakal
जळगाव

Pachora Market Committee Election : सर्वच राजकीय पक्षांनी कसली कंबर; 18 जागांसाठी 234 अर्ज दाखल

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व भाजप या राजकीय पक्षांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसली असून, सध्या तरी चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत १८ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (pachora market committee election All political parties how waist 234 applications filed for 18 seats jalgaon news)

बाजार समितीच्या १८ जागा असून, त्यात सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणसाठी ७, महिला राखीवसाठी २, इतर मागाससाठी १, भटक्या जाती जमातीसाठी १ अशा ११ जागा असून, यासाठी अनुक्रमे १०१, १४, १९ व १५ असे १४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण २, अनुसूचित जाती १, आर्थिक दुर्बल १अशा ४ जागा असून, यासाठी अनुक्रमे ३३, १५ व १० असे ५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

व्यापारी मतदारसंघासाठीच्या २ जागांसाठी २२ तर हमाल मापाडी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ५ असे १८ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सर्वपक्षीय उमेदवारांसह शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

माजी संचालक लांबच

२०१० ते २०१२ या कालावधीत बाजार समिती कारभारातील अनियमितता व अवाजवी खर्च या संदर्भात सहकार निबंधक, विभागीय आयुक्त, सहकार मंत्री व खंडपीठात झालेल्या तक्रारीनुसार १६ माजी संचालकांवर ६९ लाख रुपये वसुलीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या मालमत्तेवर टाच बसविण्यात आली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या उमेदवारांना आपल्या नावे असलेल्या व बाजार समितीत भरावयाच्या रकमेचा भरणा केल्याशिवाय उमेदवारी करता येणार नाही हा नियम असल्याने प्रताप पाटील, रावसाहेब पाटील, सचिव पी. के. सोनवणे, सीमा पाटील, पंढरीनाथ पाटील, राजेंद्र परदेशी, शांताराम धनराज पाटील, राजेंद्र पाटील, नारायण पाटील, निवृत्ती पवार, जिजाबाई पाटील, रवींद्र पाटील, कल्पेश संघवी, भास्कर मगर, रंगराव नेरपगार, नामदेव अहिरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल न करता आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, सहकारी यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज दाखल केलेले दिग्गज

या निवडणुकीत शिवसेनेचे नेतृत्व आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व माजी आमदार दिलीप वाघ व संजय वाघ, भाजपचे नेतृत्व अमोल शिंदे व सतीश शिंदे, ठाकरे गटाचे नेतृत्व वैशाली सूर्यवंशी व काँग्रेसचे सचिन सोमवंशी करीत आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यात शिवसेना, उद्धव ठाकरे सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या दिग्गजांचा समावेश आहे.

त्यात भाजपचे बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे, उपसभापती ॲड. विश्वास भोसले, सिंधूताई शिंदे, दिलीप पाटील, शेख गनी, श्रावण लिंगायत, संजय पाटील, अर्चना पाटील, लक्ष्मण पाटील, नरेंद्र पाटील यांचा समावेश असून, शिवसेना ठाकरे गटातर्फे उद्धव मराठे, ॲड. प्रवीण पाटील, गणेश परदेशी, प्रशांत पवार, मनोज महाजन, रघुनाथ महाजन, जिल्हा उपप्रमुख दीपक पाटील, माजी संचालक मच्छिंद्र पाटील ,अशोक पाटील यांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक शीतल सोमवंशी, अंबादास सोमवंशी, अजय देवरे, नितीन पाटील, पूनम पाटील, प्रतिभा पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत धनवडे यांचा समावेश असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भडगावचे माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, विजय पाटील, जयसिंग परदेशी, रामधन परदेशी, शालिक मालकर, सुदाम वाघ, रणजीत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वंदना चौधरी, भडगावचे डी. डी. पाटील, अलका पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांचा समावेश आहे.

युती, आघाडी धर्म पायदळी

राज्यात युती, आघाडी धर्म पाळून निवडणुका लढल्या जाव्यात, असे वरिष्ठ पातळीवरून जाहीर करण्यात आले असले तरी सध्याची स्थिती पाहता स्थानिक पातळीवर मात्र युती व आघाडीचे तीनतेरा होण्याचे चित्र दिसत आहे. कारण स्थानिक पातळीवरील युती आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची ओढाताण आहे.

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी गेल्या वर्षी झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमात सहकारात आम्ही राजकारण आणणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यामुळे ते दोघे एकत्र येतात की वेगळी चूल मांडतात? हे अजून स्पष्ट नाही. शिवसेना-भाजपची युती असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे व भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सतीश शिंदे यांच्यातून विस्तवही जायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तोच प्रकार शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात असून, त्यांच्यातही आघाडी धर्म पाळला जाईल, असे चित्र दिसत नाही. राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व सहकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे युती, आघाडी धर्म पायदळी तुडवला जाईल, असे सध्या तरी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT