Jalgaon Paladhi riot esakal
जळगाव

Jalgaon News : पाळधी दुसऱ्या दिवशीही पूर्णत: बंद; दगडफेकप्रकरणी 16 जणांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पाळधी (ता. धरणगाव) : येथे मंगळवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांत दगडफेक झाली होती. त्यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली होती. सलग दुसऱ्या दिवशीही सर्व व्यवसाय पूर्ण बंद करण्यात आल्याने येथील जनजीवन ठप्प झाले आहे. शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी ५८ जणांना अटक झाली असून, त्यांपैकी सोळा जणांना पोलिस कोठडी, तर उर्वरित संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, गावात ३२ वर्षांत प्रथमच अशी घटना झाली आहे. या दंगलीतील दोषींवर निश्‍चितच कारवाई होईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

पाळधी गावात मंगळवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांत तुफान दगडफेक झाली. गावातील एका धार्मिक स्थळाजवळून जळगावातून सप्तशृंगीगडावर पायी दिंडी जात असताना डिजे वाजविल्यावरून दगडफेक झाली होती. संशयित शेख सलिम शेख गनी कुरेशी याने ट्रक पोलिसांच्या अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात धडक बसल्याने पोलिस शिपाई जितेश नाईक जखमी झाले.

पोलिसांशी हुज्जत घालून मारहाण, जखमी करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटांतील शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत ८८ जणांना अटक केली. त्यांपैकी सोळा जणांना पोलिस कोठडी, तर उर्वरित संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गावात गुरुवारी (ता.३०) संचारबंदी आदेश लागू आहे.

गुरुवारी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे आदी ठाण मांडून होते.

गावात शांततापूर्ण वातावरण आहे. जळगावातून वणी येथील सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पालख्या, दिंड्या पाळधी गावातून न नेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी केल्या. त्यामुळे त्या गावाबाहेरून जाणाऱ्या महामार्गावरून नेण्यात आल्या.

दोषींवर कारवाई होईलच : पालकमंत्री

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीनंतर पाळधीतील दंगलीविषयी पालकमंत्री पाटील म्हणाले,‘ गावात ३२ वर्षांत जातीय दंगल होऊ दिली नाही. मंगळवारी घडलेली दंगल माझ्या जीवनातील सर्वांत वाईट प्रसंग आहे. गैरसमजातून दंगल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाळधी गावात दर वर्षाला दंगल होत होती, हा पोलिस रेकॉर्ड आहे.

मात्र, मी १९९२ नंतर या गावात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही. गावात मुस्लिम समाजबांधव नमाजपठण करीत असताना, बाहेरून पालखी आली. पालखीतील डिजेचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्यातून गैरसमज झाले व त्यातून आमच्या गावात दंगल झाली. गैरसमजातूनच हा प्रकार घडला आहे.

दोन्ही बाजूंकडील लोक हे आपलेच आहेत. यात जे दोषी असतील, ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आतापर्यंत ५८ जणांना अटक झाली असून, दोषींवर निश्‍चित कारवाई होईलच, असेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारचा आठवडी बाजार बंद

पाळधी गावात दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, आज (ता.३०) दुसरा दिवस होता. सकाळपासून कडक बंदोबस्त होता. त्यामुळे रिक्षा, खासगी वाहनेही बंद करण्यात आली होती. काही बस गावात आल्या तर काही वळण रस्त्यावरून गेल्याने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यांना वळण रस्त्यावर जावून बस पकडावी लागली.

दोन्ही गटातील संशयितांचा शोध सुरूच आहे अशी माहिती पाळधीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी दिली. दिवसभर चाळीसगावचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चोपड्याचे उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले हे पाळधीत लक्ष ठेवून होते. दरम्यान, उद्याचा (ता.३१) शुक्रवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

दगडफेकप्रकरणी तिसरा गुन्हा

पाळधी येथे झालेल्या दोन गटातील दगडफेकीनंतर गुरुवारी (ता. ३०) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणी आज रफिक रज्जाक देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देशपांडेवाड्यात श्रीरामाचे नारे देण्यात आले. यावेळी त्यांना हटकले असता त्यांनी मला लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून टिपू सुलतान यांचा फोटो फाडला.

त्यांनी केलेल्या मारहाणीत डाव्या डोळ्यावर जखम झाली असून, गालावर लागले आहे. यानुसार चंदू भगवान माळी, किरण लक्ष्मण माळी, स्वप्नील नाना फुलपगार, महेश लीलाधर सोनार, मयूर राजू व्यास, संजय पांडे व इतर ४०० ते ५०० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण निकुंभ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT