Sakharam Maharaj Yatrotsav esakal
जळगाव

Sakharam Maharaj Yatrotsav : संत सखाराम महाराजांचा जयघोष; बोरी नदीपात्र भाविकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानची पालखी मिरवणूक बुद्ध पौर्णिमेला शुक्रवारी (ता. ५) उत्साहात पार पडली. यानिमित्त भक्ती, शक्ती आणि परंपरेचा अपूर्व संगम दिसून आला. ग्रामीण भागातील भाविकांनी गुरुवारी (ता. ४) रात्रीपासूनच बोरी नदीपात्रात गर्दी केली होती. (Palkhi Procession of Sant Sakharam Maharaj was carried out on Buddha Purnima jalgaon news)

संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवात रथानंतर पालखी मिरवणूक महत्त्वाची असते. संपूर्ण महाराष्ट्रातून पालखी मिरवणुकीसाठी भाविक हजेरी लावत असतात. सकाळी सहाला विधिवत पूजा करून वाडी संस्थानमधून पालखी मिरवणुकीस सुरवता झाली.पालखीत सजावट केलेली हातात धनुष्य बाण घेतलेली मूर्ती ठेवण्यात आली होती.

पालखीच्या पुढे माऊली मित्र मंडळ, मंगळदेव संस्थानचे ढोलपथक, बालवीर व्यायामशाळेचे ढोलपथक, प्रताप व्यायामशाळेचे ढोलपथक, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे ढोलपथक, भुसावळ येथील रेल्वे बँड पथक, नादब्रह्म ढोल पथक होते. त्यापाठोपाठ मेणा, निशाणाचे घोडेस्वार, भालदार व चोपदार होते.

त्यांच्यामागे पालखी आणि पालखीच्या मागे प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. सकाळपासून महिला, पुरुष, वृद्ध व बालकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. रस्त्यात परंपरेप्रमाणे महाराज ठरल्या काणी पान सुपारीला थांबले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सराफ बाजार परिसरात रोटरी क्लब, राजहोळी चौक मित्र मंडळ, विक्रांत पाटील मित्र परिवार, सोनार असोसिएशन, पानखिडकी मित्र परिवार, गोपाल चौक मित्र मंडळ, राजे संभाजी मित्र मंडळ व इतर सामाजिक संस्थांतर्फे थंडपेय, कैरीचे पन्हे, मठ्ठा, ताक, सरबत, पोहे व खिचडीचा महाप्रसाद मोफत वाटण्यात येत होता.

वाडी चौक, राजहोळी चौक, पानखिडकी, दगडी दरवाजा, फरशी पूल, मारुती मंदिर, पैलाडमार्गे बोरी नदीच्या वाळवंटातून पालखी मिरवणूक नदीपात्रातील समाधी मंदिराजवळ पोहोचली. तेथे संत प्रसाद महाराजांनी गुलालाची उधळण केली आणि ठेका धरला. अतिशय शांततेत मात्र जल्लोषात हा उत्सव पार पडला.

रखरखत्या उन्हातही संत प्रसाद महाराज व त्यांचे सहकारी अनवाणी चालत होते. अशाही परिस्थितीत प्रसाद महाराज भक्तांना खडी साखरेचा प्रसाद देऊन भक्तीचा गोडवा आणि गारवा देत होते. सायंकाळी महाराजांच्या पायाला अक्षरशः फोड आले होते. रात्री पुन्हा ते भजन, कीर्तनात आनंदाने रंगले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT