Maha Shiv Puran Katha : जीवनात चुकीच्या व्यक्तींना जवळ करु नका. जे लोक आपल्या जीवनाचे सार्थक करतील, आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग दाखवतील अशा व्यक्तींना शोधा, त्यांना मित्र बनवा, असा मंत्र पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी शिवभक्तांना दिला.
जळगाव शहरानजीक कानळदा मार्गावर वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात पं. मिश्रांच्या श्री शिवपुराण कथेस मंगळवारपासून प्रारंभ झाला. (pandit Pradeep Mishra guidance Find good people who make life worthwhile jalgaon news)
या कथेत पहिल्या दिवशी कथेचे निरुपण करताना श्री. मिश्रा बोलत होते. अतिभव्य सभामंडपात हजारो भक्तांच्या साक्षीने पं. मिश्रा यांनी कथेस सुरवात केली.
माता-पिता, गुरचे महत्त्व
आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन वाहने बाजारात आली आहेत. काही वाहनांना क्लच नाही, गिअरही नाही. मात्र, अशी एकही गाडी नाही की जिला ब्रेक नाही. ब्रेकशिवाय गाडी थांबूच शकत नाही.
तसे आपल्या जीवनात माता, पिता व गुरुंचे महत्त्व आहे. आयुष्यात अनेकदा आपण चुकीच्या मार्गाने जात असतो, तेव्हा प्रत्येक वेळी आई- वडील, गुरु आपल्याला त्या मार्गावर जाण्यापासून रोखतात.. आपल्या वाईट वर्तणुकीला ‘ब्रेक’ लावतात. त्यामुळे माता- पिता, गुरुचे प्रत्येकाच्याच जीवनात महत्त्व आहे, असे श्री. मिश्रा म्हणाले.
सनातन धर्मच शाश्वत
सनातन धर्माची पताका शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा आदींनी फडकवत ठेवली. जिजाऊंनी मुलाचे नाव शिवाजी का ठेवले? त्या स्वत: शिवाच्या भक्त होत्या, म्हणून मुलाला शिवाजी केले.
आणि युद्धाच्या वेळी ‘हर हर महादेव’ नाराही दिला. हर हर म्हणजे दु:ख, संकट, आपत्ती दूर करणारा.. गेल्या काळात महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी सनातन धर्माचा पुरस्कार हिंमतीने केला, त्यांचेच विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत, असे आवाहन त्यांनी केले.
संत मुक्ताईच्या पावन भूमीत
पंडित मिश्रा यांनी आपल्या कथा निरुपणात जळगावचा संत, महंत, साधूंची भूमी असा उल्लेख केला. संत मुक्ताईने ज्या ठिकाणी विठ्ठलाची, पांडुरंगाची भक्ती केली, त्या ठिकाणी शिवपुराण कथा निरुपणाची संधी मिळते, ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
जळगावकरही मुक्कामी
जळगाव जिल्ह्याबाहेरुन हजारो भक्त कथास्थळी दाखल झाले असून ते सहा दिवस याच ठिकाणी राहणार आहेत. मात्र, जळगाव शहरातील असंख्य भक्तही बॅगा भरुन कथास्थळी आले असून दररोज गर्दीतून घरी ये- जा करण्यापेक्षा सहा दिवस याच ठिकाणी मुक्कामी थांबू म्हणून त्यांनी त्यांची व्यवस्था कथास्थळी करुन घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.