पारोळा (जि. जळगाव) : येथील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात पोलिसांनी अवैध धंद्यांवर (Illegal Trades) करडी नजर टाकत तब्बल एक लाखांवर मुद्देमाल जप्त केला आहे. रत्नापिंप्री येथील रॉयल गार्डन हॉटेल येथे अमोल नागराज शिंदे अवैध दारूविक्री (Illegal Liquor Selling) करीत आहे, अशी माहिती मिळाली. छापा टाकला असता, दारू बॉटलसह एकूण ७ हजार ६३० रुपयांचा माल मिळून आला. (Parola police demolished illegal trades Jalgaon Crime News)
अमळनेर पारोळा रोडवरील भिलाली फाट्याजवळील शिवार हॉटेलजवळ वसंत मराठे याच्या ताब्यात एकूण ४ हजार ५३० रुपयांची इंग्लिश व देशी दारू मिळून आली आहे. सदर कारवाइ पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विनोद साळी, सुनील वानखेडे, संदीप सातपुते, राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील स्थानिक गुन्हे शाखेने केली. मोहाडी येथे हॉटेल फौजीच्या मागे नाल्यालगत किशोर ठाकरे हा देशी-विदेशी दारू विकत असल्याची माहिती मिळाली छापा टाकला असता त्याजवळ ३ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जोगलखेडा येथील प्रदीप प्रल्हाद देवरे जोगलखेडा फाट्याजवळ हॉटेल रायबा येथे देशी विदेशी दारू विकत होता.
त्याच्याजवळून ९ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जोगलखेडा गावच्या फाट्याजवळ हॉटेल तोरणाचा मालक देशी, विदेशी दारू विकत असल्याच्या माहितीवरून छापा टाकला असता, १ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भिलाली गावी हिवरखेडाकडे जाणाऱ्या कच्चा रोडलगत बोरी नदी काठी मनोज अशोक पवार दारूभट्टी चालवत होता. छापा टाकला असता त्याच्या जवळ ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दारुभट्टीचे साहित्य नष्ट करण्यात आले. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस नीलेश गायकवाड, उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाले, सहाय्यक फौजदार जयवंत पाटील, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजित पाटील, आशिष गायकवाड, मोहसीन, राहुल पाटील या पोलिस पथकाने वरील एकूण सात अवैध दारूभट्टी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत एकूण १ लाख १६ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.