sharad pawar sakal
जळगाव

शालेय प्रलंबित मागण्यांसाठी संस्थाचालकांचे पवारांना साकडे

गुणवत्ताप्राप्त उमेदवार नियुक्त करण्याची परवानगी द्यावी आदी मागण्यांवर चर्चा झाली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : खासदार शरद पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्चशिक्षण व शालेय शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांबाबत विविध मागण्या करण्यात आल्या. सखोल चर्चा केल्यानंतर निवेदन खासदार शरद पवार यांना दिले. या प्रसंगी राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, राज्यसभा सदस्य खासदार फौजिया खान, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार विजय गव्हाणे, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, कार्यवाह रवींद्र फडवणीस, आप्पासाहेब बालवडकर, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, प्रा. सुशिला मोराळे, कोंडाजी आव्हाड, मारुतीराव म्हात्रे, डाॅ. अनिल शिंदे, कांचनमाला गावंडे, विनय राऊत यांच्यासह अनेक संस्था संचालक उपस्थित होते.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे कायम विनाअनुदान तत्त्व रद्द करून सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर करावे, शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करून पूर्वीप्रमाणेच प्रचलित पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी, महापालिका व नगरपरिषद हद्दीतील शाळा- महाविद्यालयांना मालमत्ता करातून सूट द्यावी, वेतन आयोगानुसार शाळा महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान २५ टक्के द्यावे, प्राध्यापक भरती सुरू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, सेवक व लिपिकांच्या जागा त्वरित भराव्यात, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरू ठेवावी, विनाअनुदानित महाविद्यालये अनुदानावर आणावी, तासिका तत्त्वावर नियुक्तीसाठी प्रवर्गातील व पात्रताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवीमध्ये बी प्लस गुणवत्ताप्राप्त उमेदवार नियुक्त करण्याची परवानगी द्यावी आदी मागण्यांवर चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT