While inspecting the EVM machine godown, District Officer Ayush Prasad, District Superintendent of Police M. Rajkumar, Tehsildar Neeta Labde etc. esakal
जळगाव

Fire Accident: ‘ईव्हीएम’ स्ट्रॉंगरुम गोदामावरील प्लास्टिक ताडपत्रीला आग; रॉकेटमुळे आग लागल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Fire Accident : येथील तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय ईव्हीएम मशीन गोदाम तयार करण्यात आले आहे. या गोदामाच्या छतावरील प्लास्टिकच्या ताडपत्रीला आग लागल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी (ता. १२) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

रॉकेट किंवा फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार नीता लबडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर अवघ्या २५ मिनिटांत भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या दोघे कार्यालयांना ताबडतोब सूचना देण्यात आल्या. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर सकाळी सर्वपक्षीय विशेष बैठक घेण्यात आली. (Plastic tarpaulin on EVM strong room godown caught fire jalgaon news)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, मतदारांच्या नावनोंदणीसह विविध कामांना वेग आला आहे. निवडणुकीसाठी प्राप्त झालेले ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी भुसावळला गोदामात  जिल्हास्तरीय स्ट्रॉंगरूम तयार करण्यात आले आहे. या गोदामाची प्रथम तपासणी ऑगस्टमध्ये करून गोदामाला सील करण्यात आले आहे. या गोदामात २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण करण्यात येत असून, २४ तास पोलिस गार्डही उपलब्ध आहे.

गोदामाच्या छताला कुठलेही लिकेज होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून प्लॅस्टिक ताडपत्री लावण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवशी रविवारी (ता.१२) रात्री नऊ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान काही पोलिस गार्ड व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, की गोदामाच्या वर टाकलेल्या प्लास्टिक ताडपत्रीला आग लागली आहे. पाच ते दहा स्क्वेअर फूट क्षेत्रात आग पसरण्यापूर्वी भुसावळ पालिका अग्निशमन दल पाच मिनिटात घटनास्थळी पोहचून पाणी टाकून आग विझवली.

ईव्हीएमला अडचण नाही

या घटनेच्या प्राथमिक तपास महसूल विभाग, पोलिस विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन दल यांच्या माध्यमातून करण्यात आला. आग लागल्याने गोदामाच्या छताला कुठल्याही प्रकारचा धोका, लिकेज तसेच मधील ईव्हीएम मशिनला कुठलीही अडचण झालेली नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून फेरतपासणी करण्यात आली.

भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या दोन्ही कार्यालयांना ताबडतोब सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सुचनेनुसार सोमवारी (ता.१३) सकाळी दहाला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राजकीय पक्षांची विशेष बैठक बोलवण्यात आली. व्हॉट्सॲप व एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली, तसेच फोनच्या माध्यमातून बोलण्यात आले. त्याचे सर्व पक्षांचे प्रतिनिधी सकाळी तहसील कार्यालयात उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, एसपींकडून पाहणी

या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची उपस्थिती होती. ईव्हीएम मशीन गोदामाची आग लागलेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. या संदर्भात कुठल्याही पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. प्रथमदर्शनी ही एक अपघाताची घटना आहे. कुठले तरी रॉकेट किंवा फटाके या ठिकाणी पडलेले असेल.

पोलिस विभाग, अग्निशमन विभाग, बांधकाम विभाग या तिघेही विभागांना पत्र देऊन त्याचे औपचारिक तपास करून त्याचा अहवाल एकत्रित करून तसेच राकजिय पक्षाचे मिनिट्स एकत्रित करून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्रच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाला पाठविणार आहे.

"दहा स्क्वेअर फुटात जळालेल्या ठिकाणी नवीन ताडपत्री बसविण्याचे नियोजन करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून हा तपास सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या समोर करण्यात आला. लवकरच याचा अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल." - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

'‘ईव्हीएम’ २४ सात निगराणीत''

भुसावळ शहरातील तहसील कार्यालयात जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय गोदाम बनविण्यात आले असून, यामध्ये ऑगस्ट २०२३ ला बॅलेट युनिट नऊ हजार ३४० तर कंट्रोल युनिट पाच हजार ४५० स्ट्रॉंगरूमला सील करून सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस गार्ड यांच्या चोवीस तास निगराणीत ठेवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

MP Priyanka Chaturvedi : त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे... त्यांना माहितीये ते हरणार आहेत..

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

SCROLL FOR NEXT