PM Crop Insurance Scheme : यंदा महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले असून, त्यांनी ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.
दरम्यान, सर्वाधिक प्रतिसाद कापूस पिकासाठी मिळाला असून, जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ५४६ शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी विमा उतरविला आहे. (PM Crop Insurance Scheme Four and half lakh beneficiaries of crop insurance in district jalgaon news)
अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटांशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो. आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समाईक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता.
मात्र २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयात विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. योजनेमध्ये सहभागासाठी प्रथम ३१ जुलै ही अंतिम मुदत होती.
मात्र, काही भागात अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित होणे, वेबसाईट सर्व्हर डाऊनसह इतर समस्या आल्या. त्यामुळे तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत उर्वरित शेतकरीही योजनेत सहभागी झाले. एकुणच एक रूपयात पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५८६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण दोन पट जास्त आहे.
जिल्ह्यातील एक रूपयात पीक विमा पोटी १७७६ कोटी ९४ लाख ४६ हजार २३० रूपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे. सर्वाधिक कापूस, त्याखालोखाल मका, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद, बाजरी, भुईमूग व तीळ या पिकांचा विमा काढण्यात आला आहे.
जनजागृतीचा चांगला परिणाम
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी कृषी, महसूल विभागाने जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. यामध्ये गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पीकविम्याचे फायदे सांगण्यात आले. पीक पेरणी ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीठ, वादळ, चक्रीवादळ यामुळे होणारे पिकांच्या नुकसानीत शेतकऱ्यांना परतावा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.