जळगाव

PM Crop Insurance Scheme : केवळ 1 रुपया भरा अन् पीकविमा योजनेत सहभागी व्हा!

सकाळ वृत्तसेवा

PM Crop Insurance Scheme : केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना जळगाव जिल्ह्यासाठी लागू केली आहे. योजनेत नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. (pm Crop insurance scheme Pay only 1 rupee and participate jalgaon news)

या योजनेद्वारे खरीप पीक प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवणे न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान या घटकांच्या निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

...या पिकांचा समावेश

या योजनेत ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तीळ, मूग, उडीद, तूर, कापूस, मका या अधिसूचित खरीप पिकांसाठी पुण्याच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

मात्र, भाडेपटीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

७० टक्के जोखीम स्तर

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के व नगदी पिकासांठी पाच टक्के असून, २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना प्रतिअर्ज केवळ एक रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम एक वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल. सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित केला आहे.

योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास...

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा, न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे.

जे कर्जदार शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक समजला जाईल. बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक, आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. संबंधित शेतकऱ्यांना बँकेत आपले बचत खाते उघडणे आवश्यक राहील.

योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा सरंक्षण रक्कम, जोखीमस्तर असा

पीक -- जोखीम स्तर टक्के -- विमा संरक्षित रक्कम

ज्वारी -- ७० -- २४ हजार

बाजरी -- ७० -- २० हजार

सोयाबीन -- ७० -- ३६ हजार

भुईमूग -- ७० -- ३२ हजार

तीळ -- ७० -- २२ हजार

मूग -- ७० -- २० हजार

उदीड -- ७० -- २० हजार

तूर -- ७० -- २५ हजार

कापूस -- ७० -- ४० हजार

मका -- ७० -- २६ हजार २००

"प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ साठी कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आजपासूनच पिकांचा विमा काढवा. जेणेकरून शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. जनसुविधा केंद्रावर विनामूल्य अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे." - रविशंकर चलवदे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT