poet go mhaskar poem tanga palti ghode farar go viral on social media jalgaon news esakal
जळगाव

Social Media Viral : ‘टांगा पलटी घोडा फरार'चा सर्वत्र धुमाकूळ; सोशल मीडियावर कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद...

सुधाकर पाटील

Social Media Viral : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर नगरदेवळा (ता. पाचोरा) येथीर युवा कवी गो. शि. म्हसकर यांनी लिहलेली 'टांगा पलटी घोडा फरार' या कवितेने राज्यात धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या कवितेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

नगरदेवळ्याचे सुप्रसिद्ध युवा कवी गो. शि. म्हसकर यांनी नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथ संदर्भात आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. (poet go mhaskar poem tanga palti ghode farar go viral on social media jalgaon news)

सोशल मीडियावर 'टांगा पलटी घोडा फरार' या शिर्षकाखाली लिहिलेल्या कवितेने आतापर्यंत प्रचंड धुमाकूळ घातला असून, कवी म्हसकरांना अनेकांनी याबाबत धन्यवाद दिले.

मंत्रालयात होत असतो,

अधून मधून जुलमी करार,

लोकशाहीचे अंगण म्हणजे,

टांगा पलटी घोडा फरार..!!

पक्षासाठी नेता नाही,

नेत्यासाठी पक्ष नाही,

जनतेच्या हिताकडे,

आता कुणाचं लक्ष नाही..!!

या कवितेने अक्षरश: नेटकरींना घायाळ केले आहे. कवी म्हसकर हे तसे मुळात सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असून, शेती, निसर्ग, कला, साहित्य या प्रांतात वावरणारे आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र आजच्या राजकीय घटनांमुळे त्यांना अस्वस्थता वाटू लागल्यामुळे मार्मिक शब्दांत आजच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी कवितेतून ताशेरे ओढले आहेत. कोरोना काळात देखील अहिराणी गीतातून जनजागृतीपर व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभर अहिराणी गीते देखील गाजले होते.

कवी म्हसकर यांच्या प्रत्येक कवितेची एक वेगळी खासियत म्हणून खानदेशात परिचित आहेत. गझल, रुबई, चारोळी, अष्टाक्षरी यासह विविध प्रकारचे काव्यछंद हाताळण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

राज्यभरातून काॅमेंटचा पाऊस

कवी गो. शि. म्हसकर यांनी लिहलेल्या 'टांगा पलटी घोडा फरार' ही राजकीय विडंबन कविता राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी म्हसकरांना फोन करून कौतुक केले.

म्हसकर यांनी सांगितले, की राज्यभरातून अनेकांनी माझ्या कवितेचे केले. काव्यातून राजकीय परिस्थितीवर बोट उठविल्याबद्दल अनेक जेष्ठांनी शाबासकी दिल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT