Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शोधायला गेले सट्ट्याचा अड्डा, हाती लागला गॅस अड्डा!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील ट्रॅफिक गार्डनमध्ये सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्याचे वृत्त प्रकाशित झाल्यावर दुसऱ्या दिवशी उपअधीक्षकांच्या आदेशाने कारवाईस सुरवात झाली.

जिल्‍हापेठ पोलिसांनी सायंकाळी कारवाई करून या बेकायदेशीर गॅस अड्ड्यावरून दोन सिलिंडर आणि बेकायदेशीर बदल करून रिक्षावर बसविलेले अनधिकृत गॅसपंप ताब्यात घेतले. मात्र, थातूरमातूर कारवाई करत गॅस यंत्र असलेली बेकादेशीर रिक्षा सन्मानाने परत पाठवली गेली.

शहरात अवैध धंदे बोकाळले असून, राजकीय पदाधिकारी आणि पोलिस यांच्या अभद्र युतीने जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. (Police Found Illegal business of gas cylinder when he go for found gambling adda Jalgaon Crime News)

तिन्ही बाजूने पोलिस लाइन असलेल्या सुरक्षित अशा स्वातंत्र्य सेनानी मिरशुक्रूल्ला उद्यानाच्या मोकळ्या जागेवर खुलेआम सट्ट्याचा अड्डा चालवला जात असल्याचे चित्रण सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे व्हायरल करण्यात आले.

याच्या बातम्या छापून आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या विशेष पथकाने कारवाईस सुरवात केली म्हणून जिल्‍हापेठ पोलिसांनीही लीड घेत या ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत सट्ट्याच्या अड्ड्यावर कोणीही सापडले नाही. म्हणून पोलिसांनी अस्थायी टाकलेला अडोसा नेस्तनाबूत केला.

जाताना मात्र या पथकाला समोरच अवैधरीत्या स्वयंपाक सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणारा अड्डा दृष्टीस पडल्याने त्यांनी बेकायदेशीर गॅसपंप, घरगुती वापरातील सिलिंडर, गॅस भरण्यासाठी आलेल्या ऑटोरिक्षा असा भला मोठ्ठा लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले.

गुन्हा दाखल

पोलिस कर्मचारी केतन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम (३),(७) अन्वये आरिफ अल्ताफ हुसेन (वय ५७, रा. गेंदालाल मील) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन इलेक्ट्रीक मोटार, २ गॅस सिलिंडर असा ऐवज जप्त करण्यात आला. मात्र गॅसपंप बसविलेली ऑटोरिक्षा जप्त मुद्देमालातून वगळण्यात आली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

‘ते’ गॅसफिलर जीवघेणे?

सहाय्यक निरीक्षक पवार यांच्यासह पथकाने जप्त केलेल्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांत गॅस भरण्याचे यंत्र हे एका ऑटोरिक्षावर बसवण्यात आले होते. रिक्षाचे इंजिन फिरले, की पंप गॅस सिलिंडरमधून गॅस ओढून तो वाहनांच्या टाकीत भरतो, अशी ही अतिधोकादायक यंत्रणा पोलिसांनी ताब्यात घेतली होती. मात्र, कागदावरच्या कारवाईत ती गायब झाली.

"स्वयंपाक सिलिंडर भरताना मिळून आले. दोन घरगुती सिलिंडरसहित मोटारपंप असा ऐवज जप्त केला असून, बी. पी. ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे."

- किशोर पवार, सहाय्यक निरीक्षक तथा प्रभारी जिल्‍हापेठ पोलिस ठाणे

"जीवनावश्यक वस्तू कायदा -१९५५ (Essential Commodities Act-७(३)) अन्वये घरगुती गॅस सिलिंडरचा बेकादेशीर वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर केल्यास दखलपात्र गुन्हा दाखल होऊन गुन्हा सिद्ध झाल्यास इ) दंड व शिक्षेची तरतूद आहे."

- ॲड. सुरेंद्र काबरा , जिल्हा सरकारी अभियोक्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT