जळगाव : शहरातील पोलिस ठाणे असो, की महापालिकेच्या अग्निशमन दलाचे लॅन्डलाइन फोन सध्या निरुपयोगी ठरत आहेत. गेंदालाल मिल भागात एका घरास आग लागली. शेजाऱ्यांनी अग्निशमन दल, शहर पोलिस ठाणे व नंतर ११२ वर संपर्क केल्यानंतर ४० मिनिटांनी मदत पोचू शकली. तोपर्यंत आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले होते. (Police Landline Number Useless materials in Gendalal Mill burned at fire incident Jalgaon News)
शिवाजीनगर गेंदालाल मिल भागात रुम क्रमांक ३८७ मध्ये मोहंमद शोएब मोहंमद इसहाक (वय ३७) कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, रेल्वेस्थानकावर चहा टपरी चालवून गुजराण करतात. रविवारी (ता. १५) मध्यरात्री शॉटसर्किटने त्यांच्या घराला आग लागली.
आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य जळताना पाहून शेजारील रहिवाशांनी शहर पोलिस ठाणे, महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयात लॅन्डलाइन फोनवर संपर्क केला. मात्र, दोन्ही ठिकाणचे फोन लागले नाहीत.
अखेर दीपक गुप्ता यांनी मोबाईलवरून पोलिस मदत केंद्र ११२ वर सपंर्क साधल्यावर २० मिनिटांनंतर २ वाजून ५३ मिनिटांनंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळावर दाखल झाले. तोपर्यंत शेजाऱ्यांनी शक्य ते प्रयत्न केले. मात्र, आग आग विझविताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा पोलिस दलातर्फे ११२ क्रमांक उपलब्ध आहे. हा क्रमांक सहसा मोबाईलवरून लागत नाही. जळगाव उपविभागात कार्यरत रामानंदनगर, जिल्हा पेठ, तालुका, एमआयडीसी, शहर आणि शनिपेठ पोलिस ठाण्यांच्या लॅन्डलाइन नंबरवर मोबाईलवरून फोन अनेक वेळा लागतच नाही.
नुसतीच बेल वाजते. कुणीही उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. रविवारी रात्री गेंदालाल मिलमध्ये लागलेल्या आगीवेळी नागरिकांनी तब्बल तीन वेळा शहर पोलिसांना संपर्क केला. मात्र, तेथून ‘नो रिप्लाय’ आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.